Aanjjan Srivastav Birthday: 80' चे दशक असे होते जेव्हा टेलिव्हिजनची नव्यानं सुरूवात झाली होती. तेव्हा खऱ्या अर्थानं उत्तम कथा, अभिनय, गाणी, संवाद यांची छोट्या पडद्यावरील श्रीमंती काय असते ही प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यातील एक मालिका होती ती म्हणजे 'वागले की दुनिया'. ज्येष्ठ अभिनेते अंजान श्रीवास्तव आणि अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या या मालिकेत प्रमुख भुमिका होत्या 1988 साली आलेल्या या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत अंजान श्रीवास्तव हे श्रीनिवास वागळे आणि भारती आचरेकर या राधिका श्रीवास्तव यांच्या भुमिकेतून समोर आल्या होत्या. या मालिकेत ते दोघं पती पत्नी होते. सर्वसामान्य जीवनावर आधारित ही थोडी वेगळ्या विषयावरील मालिका होती. त्यांची ही मालिका पुन्हा नव्या ढंगात, नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आली होती. 


त्याकाळी या टेलिव्हिजनसमोर बसणारे प्रेक्षक हे आपली नोकरी संपवून घरी पोहचायचे तोच टीव्ही लावायचे. एकाहून एक रंजक मालिका पाहण्यासाठी तेव्हा प्रेक्षक अक्षरक्ष: आतूर असायचे. त्यातील सर्वात गाजलेली मालिका होती ती म्हणजे  'वागले की दुनिया' ही मालिका. एक मालिका कलाकारांना खूप काही देऊन जाते. त्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून जाते परंतु तिथंपर्यंत पोहचणे हे त्या कलाकारांसाठी सोप्पे नसते. त्यांचा स्ट्रगल हा फार मोठा असतो आणि त्यांना अपार मेहनत केल्याशिवायही ते मिळत नाही. अंजान श्रीवास्तव यांची स्टोरीही काहीशी अशीच आहे. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 


हेही वाचा >>>> Ashok Saraf शर्टाची दोन बटणं कायम उघडी का ठेवायचे? खुद्द मामांनीच केलेला खुलासा


2 जूनला त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या परिवारासह केक कटिंगही केले. सध्या त्यांचे बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोआणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यांनी नुकत्याच रेडिफ.कॉमला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अभिनय कारकीर्दीचा प्रवास उलगडला आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, ''माझे वडिल हे माझ्या अभिनयातील कामासाठी नाखुश होते. माझ्या बहीणीनं माझ्या वडिलांना ती जायच्यापुर्वी तिनं सांगितलं होते की मला मुंबईला अभिनय करण्यासाठी जाऊ द्यावे. तेव्हा माझ्या वडिलांनी मला फक्त 3 चं महिनं दिले होते. जर मी परत आलो तर मी हरलो असं ते समजतील. तेव्हा माझ्याकडे राहायला घर नव्हते, नोकरी नव्हती आणि अन्नही नव्हते.'' परंतु हा सुरुवातीचा स्ट्रगल असा असला तरी त्यांनी लोकप्रिय हिंदी चित्रपटातून भुमिका निभावल्या आहेत. त्यांनी शाहरूख खानसोबतही काम केलं आहे. 'दिल हैं तुम्हारा', 'मिसिसिपी मसाला', 'चमत्कार', 'पाठशाला' अशा अनेक हिंदी चित्रपटांतून भुमिका केल्या आहेत.