मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. वहिदा रेहमान यांनी हैदराबाद हत्याकांड आणि एन्काऊंटरवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वहिदा रेहमान यांनी हैदराबाद हत्याकांडानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वहिदा रेहमान यांच असं म्हणणं आहे की, बलात्कारात दोषी आढळलेल्या आरोपींना फाशी न देता, मरेपर्यंत तुरूंगात राहण्याची शिक्षा द्यायला गवी. वहिदा रेहमान यांनी हैदराबाद हत्याकांडानंतर झालेल्या एन्काऊंटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


वहिदा रेहमान यांना हैदराबाद प्रकरणार प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'माझं असं मत आहे की, रेप सारखा अक्षम्य गुन्हा आहे. पण मला असं देखील वाटतं की, कुणाचं खासगी आयुष्य हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. बलात्कारातील दोषींना आजन्म कारागृहातच ठेवलं पाहिजे.' 


तसेच पुढे त्या म्हणाल्या की,'अशा घटनांमध्ये कायदेशीर बाबींचा विचार करता कामा नये. कारण जर एखादी व्यक्ती पुराव्यांसह पकडली गेली आहे तर त्याविरोधात गुन्हा दाखल का करावा?  असं करून आपण सामान्य जनतेचा पैशाची नासाडी करत आहोत. त्यामुळे कोणतीही कारवाई न करता अशा आरोपींना आजन्म कारागृहात डांबून ठेवलं पाहिजे.'


हैदराबाद हत्याकांडानंतर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून अशाच प्रकारे घडत असलेल्या घटना समोर येत आहेत. या विरोधातही आरोपींना तशीच शिक्षा द्या अशी मागणी देखील जोर धरत आहे. निर्भया प्रकरणानंतर अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.