Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन हे नावचं पूरेसं आहे. अख्खा जगात बॉलिवूड शहेनशाहचे करोडो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी आजही त्यांच्या बंगल्याबाहेर लोक दररोज गर्दी करतात. वयाच्या या टप्प्यातही त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावलंय. छोट्या पडद्या असो किंवा मोठा दोन्ही ठिकाणी त्यांची जादू कायम आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही सक्रीय असतात. आता बिग बी यांचा शेजारी होण्याची संधी चालून आली आहे. पण यासाठी भल्ली मोठी रक्कम मोजवी लागणार आहे. (Want to be Amitabh Bachchan neighbor Find out how and how much to pay jalsa adjacent property on sale)


काय नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी खऱ्या अर्थाने स्टारडम कमावलंय. मुंबईसह ते आता अलिबागकरही झाले आहेत. अमिताभ बच्चन यांचे शेजारी राहण्याचं भाग्य असणार आहे. बरं पण तुम्ही कधी विचार केलाय का की, अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी मिळाली तर... तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं पण त्यासाठी तगडी रक्कम मोजावी लागणार आहे. 


मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील जलसाच्या शेजारी असलेला बंगला ड्यूश बँकेने लिलावासाठी काढला आहे. अहवालानुसार बंगल्याचे कार्पेट एरीया 1,164 चौरस फूट आहे. तर मोकळी जागा ही 2,175 चौरस फूट एवढी आहे. या बंगल्याचा लिलाव आज होणार आहे. 


मोजावे लागतील इतके रुपये


बँकेने वेबसाईटद्वारे सार्वजनिक नोटीसमध्ये खुलासा केलाय की कर्जदाराने 60 दिवसांच्या आत 12.89 कोटी रुपयांची थकबाकी परतफेड केली नसल्याने हा लिलाव करण्यात येतो. या बंगल्याची मूळ किंमत 40 कोटी रुपये असून 25 कोटींचा राखीव किंमतीवर हा लिलाव होणार आहे. दरम्यान आता लिलावात या बंगल्याला किती रुपयांची बोली लागेल आणि अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याचे भाग्य कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 


जलसा बंगल्याची किंमत?


अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे एकूण 1578 कोटी रुपये असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय. पत्नी जया बच्चन आणि मुलांसोबत अमिताभ मुंबईतील आलिशान जलसामध्ये राहतात. बिग बी दर रविवारी त्यांच्या घराबाहेर त्यांच्या चाहत्यांना भेटायला येतात. हा भव्य बंगला 10,125 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त असून त्याची किंमत 100-120 कोटी रुपये असेल असा अंदाज मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलाय.