मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरत आहे. सिनेमाच्या सहाव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. पहिल्या दिवसापेक्षा सहाव्या दिवसाचं कलेक्शन नक्कीच कमी आहे. पण आतापर्यंतची कमाई एक रेकॉर्ड रचत आगे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवमीच्या सु्ट्टीचा फायदा हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफला झाला आहे. सहा दिवसांत सिनेमाने एकूण 178 करोड रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाचं कलेक्शन बघतना 200 करोड रुपयांचा आकडा पार करेल यात शंकाच नाही. 


'वॉर' सिनेमाने पहिल्या दिवशी 51.60 करोड रुपये, दुसरे दिन 23.10 करोड रुपये, तिसऱ्या दिवशी 21.30 करोड रुपये आणि चौथ्या दिवशी 27.60 करोड रुपयांची कमाई केली आहे. पाच दिवसांत या सिनेमाने जवळपास 166.25 करोड रुपयांची कमाई केली आहे. तसेच हा सिनेमा कॅनडा, यूके आणि यूएईमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.  


'वॉर' या सिनेमाने आतापर्यंत 17 रेकॉर्ड रचले आहेत. रविवारच्या कलेक्शननंतर या सिनेमाने 18 रेकॉर्ड रचून विक्रम केला आहे. यामध्ये हिंदी सिनेमात सर्वाधिक ओपनिंग फिल्म, हृतिक रोशनच्या करिअरमधील सर्वात ओपनिंग फिल्म, टायगरच्या करिअरमधील सर्वात ओपनिंग फिल्म, यशराज बॅनरची सर्वात मोठी फिल्म यासारखे अनेक रेकॉर्ड या सिनेमाचे रचले आहेत. गांधी जयंतीला रिलीज झालेल्या सिनेमांत 'वॉर'ने रेकॉर्ड रचला आहे.