Shahrukh Khan-Deepika Pathan Song : शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या गाण्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. शाहरुखच्या या गाण्याची बऱ्याच वेळा पासून वाट पाहिली जात होती. काही लोकांनी याचे कौतुक केले आहे तर काहींनी यावर टीका केली आहे. दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बोल्ड स्टाइलने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण दीपिकाने घातलेल्या बिकिनीमुळे राजकारणाला वेग आलाय. दीपिकाच्या बिकिनी स्टाइलला प्रचंड विरोध होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर दीपिकाला ट्रोल करण्यात येत आहे. याच संदर्भातील फेसबुकवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. दीपिकाच्या अंगावर मुद्दाम भगव्या रंगाचा ड्रेस दाखवला आहे, असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही फेसबुक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


इतके रंग असताना फक्त भगवा रंगचं का?


"पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाच्या अंगावर मुद्दाम भगव्या रंगाचा ड्रेस दाखवला आहे. आता यावर चमच्यांच म्हणणं काय??गाण्याचे बोल आणि अभिनेत्रीच्या कपड्याच्या रंगात एवढं साधर्म्य कसं? सिनेमातून नेमका कोणता अजेंडा रेटायचा आहे यांना? इतके सर्व रंग अस्तित्वात असताना या गाण्यासाठी फक्त भगवा रंग चं का निवडला असावा. त्याठिकाणी हिरवा रंग का निवडावा वाटला नाही? आणि जरी असला तरी "बेशरम रंग" या आशयाच्या गाण्यात आमच्या भगव्या रंगाला जाणीवपूर्वक टाकल आहे, आणि याशिवाय भगव्या रंगात अभिनेत्रीला अर्ध-नग्न देखील दाखवलं आहे," असे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.



हिंदू धर्मावर नक्कीच कलंक


"याचा अजेंडा लक्ष्यात घ्या. मंदिरात जाऊन दर्शन घेणे केवळ ढोंग आहे पण या गाण्यातून मात्र ते साफ उघडे पडले आहे. मुळात या खान ला भगव्या रंगाचा किती द्वेष आहे ते आता साफ दिसतं आहे परंतु काही हिंदू मात्र अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून जर त्या हकल्या खान चं समर्थन करतं असाल तर तुम्ही हिंदू धर्मावर नक्कीच क'लंक आहात," असेही या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.