मुंबई : 'खालीद कभी मेरा कभी स्टूडंट हुआ करता था, अब उसे लगता हैं की वो अपने टिचर से आगे चला गया हैं...' अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात हृतिक आणि टायगर यांच्यात रंगलेली जंगी जुगलबंदी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे एकेकाळी हृतिकचा शिष्य असलेला टायगर कशा प्रकारे आपल्या गुरूंच्या म्हणजेच हृतिकच्या विरेधात उभा राहतो. त्याच्यामध्ये रंगलेली स्टंटबाजी इत्यादी गोष्टींचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. 



त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री वाणी कपूरच्या ग्लॅमरस अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. चित्रपटात हृतिक 'कबीर'च्या भूमिकेत दिसत आहे तर, टायगर 'खालीद'ची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. 


हृतिक- टायगरच्या जुगलबंदीचा 'वॉर' २ ऑक्टोबर मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ आनंद यांच्या खांद्यावर आहे.