मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याच चित्रसमोर आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोर्टाने दिलेल्या तारखेपर्यंत अभिनेत्री हजर न झाल्यास तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरादाबादच्या ACJM-5 न्यायालयाने अमिषा पटेलविरुद्ध हे वॉरंट जारी केले आहे. अभिनेत्रीला 20 ऑगस्टपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 'गदर' फेम अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या ती स्वतःच्या हॉट लूकमुळे नाही, तर फसवणूक प्रकरणाबद्दल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.


काय आहे प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिषाने एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी 11 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले होते. मात्र ती कार्यक्रमाला आली नाही. जिथे तिला परफॉर्म करायचा होता पण ती या  लग्न समारंभात पोहोचली नाही. 11 लाख रुपये परत न केल्यामुळे हे प्रकरणा कोर्टात पोहोचले आहे.



दरम्यान, इव्हेंट कंपनीचे व्यवस्थापक पवन वर्मा यांनी 2017 मध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुरादाबादमध्ये खटला सुरु आहे. अमिषा आणि तिच्या सहकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये असे म्हटले आहे की, वॉरंटनंतरही अमिषा कोणत्याही वैध कारणाशिवाय कोर्टात हजर होत नाही, तर तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले जाऊ शकते.


त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. अमिषा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर अमिषा कायम सक्रिय असते.