मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मालिकेत बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमून दत्ताने तर सर्वांना घायाळ केलं आहे. सध्या बबिताजी बोल्ड अंदाजामूळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मुनमून कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे सांगत असते. पण आता टप्पूसोबत असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या टप्पू म्हणजेच अभिनेता राज अनादकट. टप्पू आणि मुनमून यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जात आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे, की टप्पूच्या आधी देखील मुनमून एका अभिनेत्याला डेट करत होती. एवढंच नाही तर त्या अभिनेत्याला लग्न देखील करणार होती. मुनमून दत्ता अभिनेता विनय जैन सोबत असेलल्या नात्यामुळे चर्चेत होती. 


आंधी (Aandhi), इश्क सुभान अल्लाह (Ishq Subhan Allah), देख तमाशा देख (Dekh Tamasha Dekh) आणि स्वाभिमान (Swabhimaan) अशआ  सुपरहिट टीवी शोमधील भाग असलेला विनय तेव्हा टीव्ही विश्वातील प्रसिद्घ चेहरा होता. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण त्यानंतर ही अफवा असल्याचं कळालं. 


पण त्यानंतर खुद्द मुनमूनने सिंगल असल्याचं स्पष्ट केलं. आता टप्पू आणि बबिताच्या नात्याची चर्चा जोरदार रंगत आहे. टप्पू आणि मुनमूनच्या वयात 9 वर्षांचा अंतर आहे. याबद्दल दोघांकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही.