Dhanush Birthday: बॉलिवूडमध्ये कधी कोणाची नाती बदलतील याचा काहीच नेम नाही. त्यातून लव्ह रिलेशनशिप्स आणि ब्रेकअप्समध्ये आपल्याला खरं प्रेम कधी मिळणार याचीच प्रत्येक जण वाट पाहताना दिसतो. त्यातून यात एक प्रकरण तोंडवर काढणं ते म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटीअल अफेअरचं. बॉलिवूडमध्येही अनेकदा एकस्ट्रा मॅरिटियल अफेअर डोकं वर काढताना दिसतं. असंच एक प्रकरण गाजलं होतं आणि ते म्हणजे दाक्षिणात्त्य सुपरस्टार धनुष आणि श्रुती हसन यांचे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की धनुष हा अभिनेते रजनीकांत यांचा जावई होता. त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा आता घटस्फोट झाला आहे. त्यामुळे श्रुती हसनचे लग्न झालेल्या धनुषसोबत संबंध होते आणि तोही तिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवून होता अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे धनुषचा घटस्फोट हा श्रुती हसनमुळे झाला असा प्रवाहही फिरायला फार वेळ लागला नव्हता. परंतु याबाबत मात्र खुद्द श्रुती हसननचं स्पष्टीकरण दिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रुती हसन ही कमल हसन यांची मुलगी आहे. त्यातून तिनंही एक स्टार कीडचं आहे. सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांची ती मुलगी आहे. त्यामुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिनंही दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून कामं केली आहेत. त्यामुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच तिनं बॉलिवूडमध्येही कामं केली आहे. खरंतर धनुषपेक्षा श्रुती हसन आणि ऐश्वर्या या लहानपणीच्या मैत्रीणीही आहेत. त्यातून त्या चांगल्या मैत्रिणीही आहेत. त्यातून चित्रपटांतून काम करण्याच्या निमित्तानं त्याची आणि धनुषची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंध आल्याच्या अफवाही पसरू लागल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगलेली होती. धनुषचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं जाणून घेऊया की, नक्की हे प्रकरण होतं तरी काय? 


हेही वाचा - हैद्राबादमध्येही 'बाईपण भारी देवा' हाऊसफुल्ल! बॉलिवूड अभिनेत्रीनं शेअर केला Video; म्हणाली, ''आजकाल चांगले सिनेमे...''


परंतु यावर अभिनेत्री श्रुती हसन हिनं अनेकदा भाष्य केले होते. आपल्या अनेक मुलाखतीतून तिनं तिच्या आणि धनुष विषयीच्या नात्यावर भाष्य केले होते. मध्यंतरी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, मला कल्पना आहे की माझ्याबद्दल आणि त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. परंतु धनुष हा माझा चांगला मित्र आहे. त्यानंच मला 3 चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहन केले होते. जेव्हा कोणाला वाटलं नव्हतं की मी हा रोल करेन तेव्हा त्याला वाटलं होतं की मीच हा करू शकते.''


आपण फक्त या क्षेत्रात चांगले मित्र असल्याचे तिनं सांगितले होते. धनुष आणि ऐश्वर्यानं 2004 साली विवाह केला होता. त्यानंतर 2022 त्यांनी आपला घटस्फोट जाहीर केला.