हैद्राबादमध्येही 'बाईपण भारी देवा' हाऊसफुल्ल! बॉलिवूड अभिनेत्रीनं शेअर केला Video; म्हणाली, ''आजकाल चांगले सिनेमे...''

Mrunal Thakur on Baipan Bhari Deva: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलो आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चर्चेत आहे. चला तर पाहुया की नक्की यावेळी मराठमोळ्या अभिनेत्रीनं या चित्रपटाचे कसे कौतुक केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 27, 2023, 10:10 PM IST
हैद्राबादमध्येही 'बाईपण भारी देवा' हाऊसफुल्ल! बॉलिवूड अभिनेत्रीनं शेअर केला Video; म्हणाली, ''आजकाल चांगले सिनेमे...'' title=
July 27, 2023 | mrunal thakur praises baipan bhari deva movie as it goes housefull at hyderabad

Mrunal Thakur on Baipan Bhari Deva: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेर आणि देशाबाहेरही या चित्रपटानं चांगलाच गल्ला कमावला आहे. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी तर महिलावर्ग दोनदा थिएटरमध्ये जाताना दिसत आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. सोबत मराठी आणि अमराठी कलाकारही या चित्रपटाचे चांगलेच कौतुक आणि स्तुती करताना दिसत आहेत. 30 जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आणि अक्षरक्ष: या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. सोबतच हा चित्रपटानं इतिहास रचतं यावर्षीच्या सर्वात बॉक्स ऑफिस कमाईच्या यादीत नावं कमावले आहे. त्यामुळे हा चित्रपट अक्षरक्ष: प्रेक्षकांचा झाला आहे. यावेळी अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनंही कौतुक केले आहे. त्यामुळे हा चित्रपट तिनंही पाहिला असून तिनं यावेळी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

यावेळी या स्क्रीनशॉटमधून आपल्याला कळून येईल की चक्क हैंद्राबादमध्येही हा चित्रपट हाऊसफुल्ल जातो आहे. याबद्दल तिनं कौतुक करत बाईपण भारी देवा चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले असून तिनं खास कॅप्शनही लिहिलं आहे. या चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. कारण आपल्यापैंकी अनेकांनी हा चित्रपट पाहिलाच असेलच. त्यातून सर्वच कानाकोपाऱ्यातून जिथे जिथे थिएटर आहे. तिथे तिथे प्रेक्षक हा चित्रपट पाहायला जात आहेत. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. आता अभिनेत्रीनं मृणाल ठाकूरनंही हैद्राबादमधील एका थिएटरचा बाईपण भारी देवाच्या हाऊसफुल्ल शोचा एक फोटो शेअर केला आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा प्रचिती येईलच की हा चित्रपट किती तूफान प्रमाणात सुरू आहे. यावेळी मृणाल ठाकूरनं काय लिहिलंय?

हेही वाचा - 18 वर्षांच्या मुलीशी लग्न, Jr NTR चं सर्वात महागडं लग्न...फक्त मंडपच 'इतक्या' कोटींचा

मृणाल ठाकूर ही अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. त्यातून तिची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. यावेळी तिनं बाईपण भारी देवा या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यावेळी हैद्राबादमधल्या एका थिएटरचा फोटो शेअर केला आहे. जिथे 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट तूफान चालतो आहे. यावेळी तिनं लिहिलं की, ''किती सुंदर सिनेमा आहे. संपुर्ण टीमचे अभिनंदन. म्हणतात आजकाल चांगले चित्रपट कुठे बनतात? बनतात बॉस! हा पाचवा आठवडा सुरू आहे. हैद्राबादमध्ये हाऊसफुल्ल शो पहिला. खूपच अभिमान वाटतोय.''

सध्या तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षक टाळ्या आणि शिट्टया वाजवताना दिसत आहे. त्याचसोबतच तिनं लिहिलंय की, '''बाईपण भारी देवा' हैद्राबादमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकतोय, क्या बात हेैं, हाऊसफुल्ल!''.