इटानगर: बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच येन केन कारणेन: प्रसिद्धीच्या झोतात असतो. यावेळी सलमान खान प्रकाशझोतात येण्यासाठी निमित्त ठरले आहे ते म्हणजे त्याने भाजपच्या नेत्यांसोबत केलेले सायकलिंग. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने सलमान खानच्या या सायकलवारीचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हीडिओ अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथील आहे. या व्हीडिओत सलमान खान मेचुका येथील ओबडधोबड रस्त्यावरून सायकल चालवताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू हेदेखील दिसत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान या ठिकाणी एका माऊंटन बायसिकल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आला होता. त्यावेळी त्याने सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला. या तिघांनी तब्बल १० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल चालवली. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सलमान खान सध्या पंजाबमध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.