मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद (Saba Azad) फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. आता ते दोघं अनेकदा स्पॉट होतात परंतु नेटकरी त्यांना पुन्हा पुन्हा धारेवर धरताना दिसतातच. त्या दोघांचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज (Videos) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हृतिक रोशनचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक एअरपोर्टवर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) सोबत लिपलॉक करताना दिसत आहे. हृतिक आणि सबाचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


एअरपोर्टवर हृतिकने सबाला किस केलं
इन्स्टंट बॉलीवूडने सोमवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद एकाच कारमधून मुंबई विमानतळावर आल्याचं तुम्ही पाहू शकता. यानंतर हृतिक त्याची लेडी लव्ह सबाला लिप लॉक करताना दिसत आहे.  


सबा आझाद तिचा बॉयफ्रेंड हृतिक रोशनला एअरपोर्टवर सोडण्यासाठी आल्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावता येतो. हृतिक रोशन आणि सबा आझादचा हा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे. हृतिक रोशन आणि सबाच्या या रोमँटिक व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.


हृतिक आणि सुझान खान (Sussanne Khan) यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पहायला मिळतंय. हृतिक सबाला डेट करत असतानाच सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. हृतिक आणि सुझानला हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे सबा आणि सुझान यांच्यातही चांगली मैत्री झाली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गेल्या वर्षी हृतिक रोशनने 'विक्रम वेधा' चित्रपटाद्वारे पुनरागमन केल्याची माहिती आहे. जरी हृतिकचा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर हृतिक रोशनचे चाहते त्याच्या आगामी 'फायटर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.