मुंबई: पाकिस्तानची ब्यूटी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमीना अशफाकवर सोशल मीडिया सध्या भलताच फिदा झाला आहे. आपल्या नितांतसुंदर डोळ्यांनी तरूणाईला भूरळ घालणारी रमीना नुकतीच २५ वर्षांची झाली. आपला वाढदिवसही तिने भलताच हटके अंदाजात साजरा केला. तिच्या या हॉट अंदाजाची सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या वाढदिवसानिमित्त रमीनाने आपला खास अंदाज दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसते. ज्याचे चाहत्यांकडून कौतुक सरू आहे. डान्स करताना तिने फ्रिंजवाला सिल्वर रंगाचा ड्रेस घातला आहे. या बॅकलेस ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसते. त्यातच तिने हायहिल्सही वापरली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे. दरम्यान, व्हिडिओ शेअर करताना रमीनाने आपल्या भावनाही शेअर केले आहेत. ती म्हणते, 'फ्रिंजवाले कपडे परिधान करण्यात खूप मजा वाटते.'



 


 दरम्यान, रमीना अशफाकचा डान्स पाहून चाहत्यांनी तिचे मुक्तकंठाने कौतुक सुरू केले आहे.