मुंबई : आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं आणि देशातील लोकांचं संरक्षण करणा-या जवांना सलाम करण्यासाठी संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांनी एक गाणं तयार केलं आहे. ‘मेरा देश ही धरम’ असे या गाण्याचे बोल आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयशी बोलताना या दोघांनी सांगितले की, ज्या जवानांनी आपल्या देशासाठी आपला जीव गमावला आहे. जे आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. त्याना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही हे गाणं तयार केलं आहे. आपण जर आपल्या घरात बेफिकीर होऊन बसलो आहोत तर ते त्या सीमेवरील जवानांमुळेच. 




त्यांनी यावेळी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटलो होतो. तेव्हा त्यांनीही आम्हाला जवानांसाठी एक गाणं तयार करण्याची सूचना केली होती.