मुंबई : वेब सिरीज स्टार मिथिला पालकर हिने गर्ल इन द सिटी या वेब सिरीजमध्ये धाडसी मुलीची भूमिका साकारली आहे. आता लवकरच इरफान खानसोबत कारवाँ सिनेमातून ती बॉलिवू़डमध्ये पर्दापण करेल. मात्र जेव्हा मिथिला शूटिंग करत नसते तेव्हा ती काय करत असते? ठाऊक आहे. तर तिचा सर्व वेळ वस्तू व्यवस्थित ठेवण्यात आणि केसांची काळजी घेण्यात जातो.


मिथिला म्हणते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत मिथिलाने सांगितले की, मी जेव्हा कॅमेऱ्यासमोर असते तेव्हा माझे केस व्यक्तिरेखेप्रमाणे बांधले जातात. पण शूटिंगनंतर ते मोकळे सोडले जातील, याची खबरदारी मी घेते. कारण त्यामुळे केस मोकळा श्वास घेऊ शकतात. केसांचे ओव्हर स्टायलिंग मी अजिबात करत नाही. तसंच ओल्या केसांवर फणी फिरवणे मी टाळते.



कुरळे केस सांभाळणे कठीण


कुरळे केस व्यवस्थित ठेवणे, खूप कठीण आहे. पावसाळ्यात तर हा त्रास अधिक वाढतो. कारण ओलाव्यामुळे कुरळे केस अधिकच गुंततात. त्यामुळे असेच कुठेतरी जायचे असेल तरी मला केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. मी झटपट तयार होण्यासाठी काही खास हेअर स्टाईल्स शिकले आहे, असेही तिने सांगितले.



पावसाळ्यात घ्यावी लागते विशेष काळजी


पुढे ती म्हणते, पावसाळ्यात बाहेर पडायचे असेल तर सर्वात आधी माझ्या डोक्यात केसांचा विचार येतो. पण तुमच्या आपल्या माणसांसाठी तुम्ही बाहेर जाणे टाळू शकत नाही. अशावेळी मी फक्त जितके शक्य होईल तितके केस व्यवस्थित कसे राहतील, हे पाहते. पावसाळ्यात केस धुताना सीमरचे काही थेंब घालते. घाई असल्यास ड्राय शॅम्पूचा वापर करते.