Katrina kaif Vicky Kaushal Wedding: शेवटच्या क्षणी कसं आहे कतरिना- विकीच्या विवाहस्थळाचं वातावरण ?
विकी- कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला फोटो
जयपूर : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या दोघांच्याही जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस अखेर उजाडला आहे. जवळपास दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विकी आणि कतरिना या निर्णयावर पोहोचले. बऱ्याच चर्चा, उत्सुकता आणि कुतूहलानंतर आता विकी- कतरिना सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात करत आहेत. (Katrina kaif vicky kaushal)
राजस्थानमधील जयपूर येथे असणाऱ्या फोर्ट बरवारामधील सिक्स सेन्सेस या सेवन स्टार रिस़ॉर्टमध्ये सध्या लगबग सुरु आहे ती म्हणजे बॉलिवूडच्या या स्टार जोडीच्या लग्नाची.
मंगळवारपासूनच विवाहस्थळी विविध आमंत्रित आणि कलाकारांनी हजर होण्यास सुरुवात केली.
फक्त कला जगतातीलच नव्हे, तर व्यवसाय क्षेत्रातीलही अनेक चेहरे या लग्नसोहळ्यासाठी सिक्स सेन्सेसकडे पोहोचत आहेत.
कतरिनाच्या वतीनं लग्नासाठी तिचं कुटुंब परदेशातून भारतात दाखल झालं आहे. ज्यांच्यासाठी खास भारतीय पद्धतीच्या मिठाईची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरेख रंगसंगतीची सजावट, ग्लास गझिबो लग्नमंडप, साजेशी वेशभूषा असंच चित्र सध्या विवाहस्थळी पाहायला मिळत असल्याची माहिती सध्या सुत्रांनी दिली आहे.
विराट कोहली, अनुष्का शर्मापासून बच्चन कुटुंबीयांपर्यंत सर्वजण या लग्नासाठी येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्याच्या घडीला बॉलिवूड चाहत्यांच्या नजरा या लग्नसोहळ्यावरच खिळल्या आहेत. ज्यामुळं सोशल मीडियावर हा विषय ट्रेंडमध्ये आला आहे.
अद्यापही विकी आणि कतरिनाच्या विवाहसोहळ्यातून कोणताही अधिकृत फोटो समोर आलेला नाही. ज्यामुळे आता कधी एकदा विकीच्या पत्नीच्या रुपात कतरिना समोर येते हेच पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.