Katrina - Vicky Wedding : दगाबाज रे .... सलमान आणि त्याचं कुटुंबही नकोच, लग्न सोहळ्यात कतरिनाचा टोकाचा निर्णय

कतरिना - सैफ आज घेणार सात फेरे 

Updated: Dec 9, 2021, 11:05 AM IST
Katrina - Vicky Wedding : दगाबाज रे .... सलमान आणि त्याचं कुटुंबही नकोच, लग्न सोहळ्यात कतरिनाचा टोकाचा निर्णय

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. आज हे दोघे सात फेरे घेणार आहेत. या दोघांच्या लग्नाला अभिनेता सलमान खान उपस्थित राहणार का? अशी चर्चा होती. मात्र कतरिनाने सलमानच्या कुटुंबियांना देखील आमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड वेडिंगमध्ये सलमान खानचे कुटुंबिय सहभागी होतील अशी अपेक्षा होती. मात्र यावर सलमान खानच्या बहिणीने अर्पिताने खुलासा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अर्पिता म्हणाली की, आम्हाला आमंत्रणच दिलं नाही. रिपोर्टनुसार, अर्पिताने स्वतःही ही माहिती दिली आहे. 

कतरिनाच्या लग्नाच्या या खास प्रसंगी दबंग खानच्या दबंग टूरचा फोटो व्हायरल झाल्यावरच सलमान खानच्या कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या. सलमान खान रियाधला रवाना होत असताना पापाराझींनी त्याची काही छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Daniya blogs (@daniyablogs8)

सलमान त्याच्या बॉडी गार्ड शेरासोबत रियाधला गेला आहे. शेरा जो राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे 'कॅटविक'च्या लग्नाच्या सुरक्षेची देखरेख करत आहे.

बॉलिवूड स्टार्स विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. वृत्तानुसार, हे जोडपे गुरुवारी (9 डिसेंबर) सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.