मुंबई : 'दीपवीर' अर्थात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या लग्नाला उद्या एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मोस्ट फेव्हरेट कपलचं उद्याचं वेळापत्रक कसं असेल? असा प्रश्न दीपवीरच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. आपल्या आवडत्या चाहत्यांच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतोच. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी दीपवीर त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस त्यांच्या कुटुंबासोबत साजरा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सर्वप्रथम तिरूपती बालाजी आणि त्यानंतर पद्मावतीचं दर्शन हे जोडपं घेणार आहेत. त्यानंतर कुटुंबासोबत अमृतसरच्या स्वर्ण मंदिराचं दर्शन घेणार आहेत. 


त्यानंतर संपूर्ण कुटुंब मुंबईत परतणार आहे. अशा प्रकारे 'दीपवीर' त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीर त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत आहेत. 


तब्बल ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नानंतर दीपिका पहिल्यांदाच 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शिवाय '८३' चित्रपटत ती रणवीरच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणार आहे.