मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार अतिशय लक्झरी आणि ऐश्वर्यातील आयुष्य जगत असतात. पण तुम्हाला या बॉलिवूड कलाकारांच्या हटके सवयींबद्दल माहित आहे का? त्यांच्या या सवयी फारच कमी लोकांना माहित असतील. जसं की करीना कपूर खानला नखं खाण्याची सवय आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाला एकसारखं ब्रश करण्याची सवय आहे. आज आपण बघूया कलाकारांना नेमक्या कोणत्या सवयी आहेत. 


करीना कपूर खान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सुंदर अभिनेत्री आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. करीना कपूर खानला नखं चावण्याची सवय आहे. सामान्य लोकांप्रमाणेच करीना देखील नख खाण्याची सवय आहे. आणि कार्यक्रमांमध्ये करीनाला नख खाताना पाहिलं आहे. 


आयुष्मान खुराना 


बॉलिवूडमध्ये 'विक्की डोनर' या सिनेमातून आयुष्मान खुरानाने पदार्पण केलं. अभिनेत्याला ओरल हाइजीनची खूप सवय आहे. एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे. तो दिवसांतून 7-8 वेळा ब्रश करतो. 


आमिर खान


आयुष्मान खुरानाप्रमाणत आमिर खानला देखील हटके सवय आहे. एका मुलाखतीत त्यांची पत्नी किरणने याबाबत खुलासा केलाय. आमिर खानला रोज रोज आंघोळ करायला आवडत नाही. 


दीपिका पदुकोण 


बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीमध्ये दीपिका पदुकोण चर्चेत असते. दीपिकाला एक वेगळीच सवय आहे. एअरपोर्टवर लोकांना ऑब्जर्व करणं दीपिकाला आवडतं. त्यांच्याबद्दल तिला काही गेस करायला आवडतं. 


सनी लिओनी 


जिस्म 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सनी लिओनी. सनीने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला दर 10-15 मिनिटांनी पाय साफ करण्याची सवय आहे. ती कायम अशी गोष्ट करते. 


जॉन अब्राहम 


सत्यमेव जयते स्टार जॉन अब्राहमला अनेक अशा सवयी आहेत. जॉनला बसल्या बसल्या सतत पाय हलवण्याची सवय आहे. 


प्रीती झिंटा 


अभिनेत्री प्रीती झिंटा आता सिनेसृष्टीपासून फार लांब आहे. मात्र तिचा चाहता वर्ग भरपूर आहे. प्रीतीला आपलं घर सतत साफ ठेवावं असं वाटतं. प्रीतीला आपल्या घरातील वॉशरूम हे सतत साफ करायला आवडतं.