मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर जेवढे सामान्य लोक बोलतात तितकीच चॅट बॉलिवूड सेलेब्स देखील करतात. आजकाल ही लोकांची गरज बनली आहे. बहुतेक सेलेब्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी करतात. सेलिब्रिटींच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर काय होते हे जाणून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. जान्हवी कपूरपासून करीना कपूरपर्यंतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची माहिती समोर आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बच्चन कुटुंबाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 


2019 मध्ये, अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन 'कॉफी विथ करण' मध्ये दिसले. त्या काळात त्यांनी त्यांच्या कौटुंबिक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काय चालले आहे ते उघड केले. दोघांनी सांगितले की, त्यांची आई जया बच्चन ग्रुपमध्ये खूप सक्रिय आहे आणि गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेज फॉरवर्ड करतात. दुसरीकडे, ऐश्वर्या राय सर्वात कमी सक्रिय आहे आणि संदेशांना प्रतिसाद देण्यासाठी बराच वेळ घेते. पुढे, ते दोघे सांगतात की, जेव्हा ते प्रवास करत असतात तेव्हा सर्व सदस्य त्यांच्या सहलीचे अपडेट देतात.


दीपिकाने ही दाखवला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप


दीपिका पादुकोणने  2020 मध्ये तिच्या कौटुंबिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा एक मनोरंजक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यात तिचे पालक 'अम्मा' आणि 'पप्पा' होते. तिचा पती रणवीर सिंगचे नाव 'हँडसम' होते आणि तिच्या सासऱ्याचा नंबर पूर्ण नाव जगजीत सिंह भवानी असा सेव्ह केला होता.



प्रियांका चोप्राचा फॅमिली ग्रुप 


2018 मध्ये दिलेल्या  एका मुलाखतीत प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा यांनी खुलासा केला होता की, सर्व चुलत भाऊ 'द चोप्रा' या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात राहतात. यामध्ये 14 जणांचा सहभाग असल्याचेही सांगण्यात आले. हे देखील सांगितले की, ते त्यांच्या आयुष्यात काय करत आहेत याबद्दल एकमेकांना अपडेट करत राहतात आणि त्यांच्या प्रवासातील फोटो शेअर करतात.



जान्हवी कपूर ग्रुप


वर्ष 2019 मध्ये, बोनी कपूरची मुलगी अंशुलाने तिच्या फॅमिली ग्रुप चॅटची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली. या गटाला 'डॅड्स किड्स' असे नाव देण्यात आले आणि यामध्ये सर्व मुले त्यांच्या वडिलांना बोनी कपूर यांना स्वत: बद्दलचे अपडेट देत ​​होते. या गटात खुशी कपूर, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर आणि अंशुला यांचा समावेश आहे.