नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहेत. आता सध्या सुशांत अत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनवर एसीबी चौकशी करत आहे. याप्रकरणी आता अभिनेत्री दीपिका पादुकोणसह सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर यांना देखील समन्स पाठवण्यात आले आहे. शनिवारी म्हणजे २५ सप्टेंबरला एनसीबी दीपिकाची चौकशी करणार आहे. त्यामुळे दीपिका आज मुंबईत दाखल होणार आहे. ती सध्या गोव्यात आहे. दीपिकाला चार्टर विमानाने मुंबईत दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान दीपिका ड्रग्स प्रकरणी जया शिवाय अन्य महिलांच्या देखील संपर्कात होती, असा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे एनसीबीने दीपिकाला देखील समन्स पाठवले आहे. ड्रग्स प्रकरणामध्ये दीपिकाचे समोर आल्यामुळे तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


जाणून घ्या कशी असेल शिक्षा 
कलम 20 B
कलम 20 B अंतर्गत ड्रग्सची निर्मिती करणे, ड्रग्स बाळगणे, विकणे किंवा ड्रग्सचं सेवन करताना कोणाला ताब्यात घेतल्यास त्या व्यक्तीस १ वर्षासाठी तुरूंगवास आणि १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येतो. 


कलम 27 A
कलम 27 A असं म्हणतो की ड्रग्स संबंधित गुन्ह्याला प्रोत्साहन देणे किंवा गुन्हेगारास मदत केल्यास कमीत-कमी १० वर्ष आणि जास्तीत-जास्त २० वर्षांपर्यंत शिक्षा होवू शकेत. शिवाय न्यायालय या प्रकरणी २ लाख रुपयांहून अधिक दंड देखील आकारू शकते.


कलम 29
गुन्हेगारी कट रचल्यामुळे आणि कोणाला ड्रग्स घेण्यास उद्युक्त केल्याप्रकरणी शिक्षा होवू शकते. 


जेव्हा बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण बाहेर आलं तेव्हा दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशशी झालेले चॅट समोर आले आहेत. हे चॅट २८ ऑक्टोबर २०१७ सालचे आहे. दोघींच्या झालेल्या संपर्कात दीपिका हशीश नावाच्या ड्रग्सची मागणी करत असल्याचं वास्तव समोर आलं आहे.