मुंबईः सध्या ओटीटी या माध्यमावर इटिंमेट सीन्सचीच चर्चा आहे. त्यातून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गेहेराईयां या चित्रपटातून किसिंग सिंग आणि बोल्डनेसची सगळी सीमारेषा पार झाली होती.  एकेकाळी सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ख्याती असलेल्या अभिनेत्रीने मात्र या चित्रपटावरून दीपिकाला चांगली गोष्ट सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“पूर्वी, नायिका एकतर खूप चांगल्या, सती-सावित्री प्रकारच्या होत्या ज्यांना काहीही कळत नव्हते किंवा त्या चारित्र्यहीन व्हॅम्प्स होत्या. नायिकांसाठी लिहिलेल्या या दोनच प्रकारच्या भूमिका होत्या. आता आपण पाहत असलेला बदल म्हणजे महिलांना माणूस म्हणून दाखवले जाते. ती आनंदी किंवा दुःखी असू शकते. ती चुका करू शकते, ती गडबड करू शकते आणि हे सर्व असूनही तुम्ही तिच्यावर प्रेम करता. नायिका त्यांच्या शरीरावरही अधिक विश्वास ठेवतात.” असे वक्तव्य आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना मल्लिका शेरावतने केले आहे. 



मल्लिका शेरावत पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. चित्रपटाचे प्रमोशन करताना मल्लिका दीपिका पदुकोणच्या 'गेहेराईयां'मधील अभिनयाची तुलना करत तिच्या 'मर्डर' या चित्रपटातील कामाबद्दल बोलताना म्हणाली की जे दीपिकाने 'गेहेराईंयां'मध्ये केलं ते मी पंधरा वर्षांपुर्वीच केलं होतं. इंडस्ट्रीतील काही लोकांनी माझा मानसिक छळ केला कारण ते फक्त माझ्या ‘बोल्ड इमेज’बद्दल बोलत होते. दीपिका पदुकोणने जे गेहेराईयांमध्ये केले होते, ते मी १५ वर्षांपूर्वी केले होते, पण तेव्हा लोक खूप संकुचित होते. तेव्हा मला खूप हिणवलं गेलं. इंडस्ट्री आणि मीडियाचा एक वर्ग माझा मानसिक छळ करत होता, हे मी तुम्हाला सांगायला हवे. हे लोक फक्त माझ्या बॉडी आणि ग्लॅमरबद्दल बोलत होते, माझ्या अभिनयाबद्दल नाही. मी 'दशावतारम', 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'वेलकम'मध्ये काम केले, पण माझ्या अभिनयाबद्दल कोणीही बोलले नाही.”


मल्लिका शेरावत सध्या तिच्या RK/RKay या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे, जो 22 जुलै रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. रजत कपूर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात कुब्बरा सैत, रणवीर शौरे, मनु ऋषी चड्ढा, चंद्रचूर राय, अभिजीत देशपांडे, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा यांच्याही भूमिका आहेत. ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा प्रमुख भूमिकेत आहेत.