मुंबई : असे काही सिनेमा असतात. जे येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर कायम स्वरुपासाठी आपलं नाव कोरतात. असेच काही जुने सिनेमा आहेत जे आजही आणि आजच्या पिढीलाही कायम लक्षात आहेत आणि तितकेच लोकप्रियदेखील आहेत. याच यादीतला सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणजे 'तुम बिन' हा सिनेमा असो किंवा मग या सिनेमातील गाणी असो किंवा मग यातील डायलॉग्स असो किंवा स्टारकास्ट असो. हा सिनेमा सगळ्याच बाजूने हिट ठरला होता. जरी हा सिनेमा खूप हिट ठरला तरी या सिनेमातील स्टार फारशी हिट झाली नाही. हे कलाकार फारसे कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमध्य दिसले नाही. एकेकाळी हिट लिस्टवर असणारे हे कलाकार आज काय करतायेत याबद्दल आम्ही तुम्हाला आमच्या या खास रिपोस्टमधून सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदली सिन्हा
'तुम बिन' हा सिनेमा अभिनेत्री संदली सिन्हाचा पहिलाच सिनेमा होता. तिचा पहिलाच सिनेमा इतका हिट झाला की, एका रात्रीत तिचा चाहता वर्ग खूप मोठा झाला. मात्र जरी तिला पहिल्याच सिनेमातून प्रसिद्धी मिळाली असली तरी, पुढे ही अभिनेत्री फारशी कोणत्या सिनेमात दिसली नाही.  हळू-हळू संदलीचं करिअर ठप्प होत गेलं आणि ती सिनेसृष्टीतून गायब झाली. यानंतर संदलीने बिझनेसमन किरण साळसकरशी लग्नगाठ बांधली. यानंतर संदलीने बॉलिवूडमधून काढता पाय घेत तिच्या पतीसोबत ती बिझनेसमध्ये सेटल झाली


प्रियांशु चटर्जी
तुम बिन या सिनेमात प्रियांशुने शेखर हे पात्र साकारलं होतं. प्रियांशु आतादेखील सिनेसृष्टीत सक्रिय आहे. 2017 मध्ये रिलीज झालेला 'बादशाहो' मध्ये प्रियांशु शेवटचा दिसला होता. या व्यतिरीक्त प्रियांशू बंगाली सिनेसृष्टीत खूप सक्रिय आहे.


हिमांशु मलिक
हिमांशु मलिकने सिनेमात अभिज्ञान ही भूमिका साकारली. यानंतर त्याने त्याच्या करिअरमध्ये काही खास केलं नाही. 'तुम बिन'नंतर हिमांशु मलिकने मल्लिका शेरावत सोबत ख्वाहिश फिल्म केली. सिनेमात दिलेल्या किसींग सीनमुळे हिमांशु मलिक खूप चर्चेत आला होता. मात्र याचा त्याच्या किरअरला काहीच फारसा फायदा झाला नाही. आतातर हिमांशूची हालत अशी झाली आहे की, त्याला ओळखणंही कठिण झालं आहे. सुंदर हेअर स्टाईल असलेल्या अभिनेत्याला टक्कल पडलेलं पाहून त्याचे चाहते आता हैराण होत आहेत. यानंतर या अभिनेत्याने निर्मीती क्षेत्रात पदार्पम केलं मात्र ईथेही ती फारशी यशस्वी झाली नाही. 



राकेश बापट
राकेश बापटने सिनेमात अमर शाह हे पात्र साकारलं होतं. पुढे अभिनेत्याला सिनेमांत फारसं यश न मिळाल्यामुळे त्याने त्याचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. छोट्या पडद्यावर राकेशने अनेक मालिका केल्या. यानंतर २०११ साली त्याने रिद्धी डोगरासोबत लग्न केलं.  'मर्यादा लेकीन कब तक' या मालिकेत या दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. 
 
अमृता प्रकाश
अमृता प्रकाशने अमरच्या बहिणीचं पात्र या सिनेमात साकारलं होतं. अमृता टीव्ही आणि सिनेसृष्टीत चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्रीने  अकबर बीरबल, प्यार तूने क्या किया, सीआईडीसोबतंच अनेक मालिकांमध्ये काम केलं. याचबरोबर तिने विवाह, एक विवाह ऐसा भी, वी आर फैमिली अशा हिट सिनेमात काम केलं. याचबरोबर अनेक हिट मालिकामध्ये अभिनेत्री दिसली आहे.