मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं बुधवारी  सकाळी निधन झालं. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. बुधवार सकाळी जवळपास 4.30 सुमारास त्यांचं निधन झालं. ह्रदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं ते फक्त 49 वर्षांचे होते. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीचं त्यांचं निधन झालं. निधनापूर्वी राज यांन जहीर खान, सागारिका घाटगे, आशीष चौधरी, समिता बांगरगी, नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्यासोबत पार्टी देखील केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या निधनाबद्दल राज यांचे जवळचे मित्र संगीतकरा सुलेमान मर्चेंट  यांनी घडलेली संपूर्ण घटना सांगितली, ते म्हणाले, 'मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली. राज यांनी वाटलं की त्यांना ऍसीडीटी झाली असावी म्हणून त्यांनी औषध देखील घेतलं. बुधवारी पहाटे चार वाजता त्यांची प्रकृती अधिक बिघडली. तेव्हा मंदिराने सांगितलं कदाचित त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला असावा.'


ते पुढे म्हणाले, 'त्यानंतर मंदिराने तात्काळ आशीष चौधरी यांना फोन करून बोलावून घेतलं. दोघांनी राजला रूग्णालयात दाखल करण्यासाठी कारमध्ये बसवलं पण ते बेशुद्ध झाले. मंदिरा आणि आशीषला राज यांना लिलावती रूग्णालात दाखल करायचं होतं. पण रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीचं त्यांनी या जगाचा निरोप घेतला.'


राज कौशल यांनी जवळपास 32 वर्षांपूर्वी एक ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे मंदिरा राज यांची प्रचंड काळजी घ्यायच्या असं देखील सुलेमान मर्चेंट यांनी सांगितलं. पती राज यांच्या निधनानंतर मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडली आहे. राज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे अनेक जुने फोटो व्हायरल होत आहेत.