मुंबई : टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे अचानक निधन झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी हादरली आहे. शुक्रवारी, रात्री 12 वाजता, सिद्धार्थाचे अंतिम संस्कार ब्रह्मकुमारीच्या रीतीरिवाजानुसार केले जातील. ब्रह्मकुमारीमध्ये दिलेल्या परवानगीमुळे ओशिवरा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 लहानपणापासूनच सिद्धार्थ आईसोबत ब्रह्मकुमारीच्या आश्रमात जात असत. त्याच्या घरी मेडिटेशनसाठी वेगळी खोली असावी अशीही त्याची इच्छा होती.सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


टीव्ही सीरियल 'बालिका वधू' मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्याचबरोबर 2020 मध्ये रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस' चा 13 वा सिजन जिंकल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याच्या कुटुंबात आई आणि दोन बहिणी आहेत.