अमृता सुभाषच्या ओढणीचं आणि स्मिता पाटील यांच काय आहे कनेक्शन ?
अमृता सुभाषला `स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार` देण्यात आला
मुंबई : 17 ऑक्टोबर रोजी स्मिता पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. स्मिता पाटील यांनी 80 च्या दशकात सिनेमांमध्ये काम केली आणि ती हिट ठरली. आज इतक्या वर्षांनी देखील 'स्मिता पाटील' हे नाव सिनेसृष्टीत अगदी आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं. इंडस्ट्री येणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीला स्मिता पाटील या नावाची क्रेझ आहे. त्यांच्यासारखं काम आपल्याला देखील करता यावं ही प्रत्येक अभिनेत्रीची सुप्त इच्छा असते.
असं असताना अभिनेत्री अमृता सुभाष हिला स्मिता पाटील यांची ओढणी भेट म्हणून मिळाली आहे. याचा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर झालं असं नुकतंच मामी फिल्म फेस्टिव्हलला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचं निमित्त आणि स्मिता पाटील यांचा वाढदिवस याचं औचित्य साधत अमृताने स्मिता पाटील यांची ओढणी घेतली होती. त्या कार्यक्रमाची आठवण अमृताने शेअर केली आहे.
अमृता सुभाष हीने आतापर्यंत दर्जेदार भूमिका सादर केल्या आहेत. तिचं म्हणणंच असं आहे की, तिचं अफेअर हे दर्जेदार आशयाशी आहे. अमृता सुभाषचं 'अस्तु' या सिनेमातील काम स्मिता पाटील यांच्या बहिणीला प्रचंड आवडलं. सिनेमाच्या प्रिमिअरच्या वेळी स्मिता पाटील यांची मोठी बहिण अनिता यांनी स्मिता पाटील यांनी घातलेली ओढणी अमृताला भेट म्हणून दिली. त्यावेळी त्यांनी अमृताला सांगितलं की, 'तू स्मीची (स्मिता पाटील) गोष्ट पुढे घेऊन जाशील असं मला वाटतंय. असंच मनापासून काम करं. जेव्हा तुला हे क्षेत्र सोडावसं वाटेल तेव्हा तू ही ओढणी फक्त तुझ्याकडे ठेवू नकोस. तर ही स्मी ची ओढणी अशा एका अभिनेत्रीला दे, जी स्मी ची गोष्ट पुढे घेऊन जाणार असेल.....
2017 मध्ये अमृता सुभाषला 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष होते. आतापर्यंत अमृताने वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम केलं. मराठीबरोबरच आता अमृता हिंदी सिनेसृष्टीत ठसा उमटवण्याचं काम करत आहे.