Sharon Stone Controversy : जागतिक स्तरावर गाजलेल्या हॉलिवूड कलाजगतामध्ये आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं या कलाजगताचा खरा चेहरा किंवा पडद्यामागं घडणाऱ्या कैक घटना सर्वसामान्य प्रेक्षकांना हादरा देऊन गेल्या आहेत. याच हॉलिवूडमधील एका ज्येष्ठ आणि एकेकाळी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेल्य़ा भयावह प्रसंगावर भाष्य केलं आहे. सहकलाकाराच्या अभिनयात सुधारणा होण्यासाठी या अभिनेत्रीला निर्मात्यानं त्याच्याशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी केल्याचं सांगत त्या निर्मात्याचं नाव जगासमोर आणलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Louis Theroux Podcast मध्ये अभिनेत्री शॅरन स्टोननं चित्रपट निर्माता रॉबर्ट इवान्सवर गंभीर आरोप केले. अभिनेता बिली बाल्डविनसोबत आपल्याला शारीरिक संबंधांसाठी रॉबर्टनं दबाव टाकल्याचं ती म्हणाली. 1993 मधील Sliver चित्रपटाच्या वेळी ही घटना घडल्याचं सांगत तिनं तो प्रसंग जसाच्या तसा कार्यक्रमात सांगितला. 


ती निर्मात्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि... 


निर्मात्यानं चित्रीकरणादरम्यानच शॅरनला ऑफिसमध्ये बोलवलं, याविषयी सांगताना ती म्हणाली, 'त्यानं मला ऑफिसमध्ये बोलवलं, तिथं 70- 80 च्या दशकातले सोफे होते. म्हणजेच मी सेटवर असण्याच्याच वेळी जवळपास त्या सोफ्यावर अर्थात जमिनीवरच बसले होते. तो (निर्माता) तिथं सनग्लास लावून त्यानं कोणाकोणाशी शरीरसंबंध ठेवले याबाबत सांगत होता. मी बिलीसोबतही असेच संबंध ठेवावेत म्हणजे त्याच्या सादरीकरणात बदल होईल, तो चांगला अभिनय करेल, आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली असेल अशी कारणं तो देत होता'. 


हेसुद्धा वाचा : Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त... 


बिलीसोबत शारीरिक जवळीत साधणं या चित्रपटाता तारू शकतं असं तिला भासवण्यात आल्याचा गौप्यस्फोट शॅरननं केला. इथं शॅरननं गंभीर आरोप केलेले असतानाच बिली बाल्डविननं X च्या माध्यमातून प्रतिक्रिया देत ती आपल्याविषयी असं का बोलतेय? हा प्रश्न उपस्थित केला. 



'तिला मी आजही आवडतो का? ती असं का बोलतेय मला कळतच नाहीये. माझ्याकडे तिच्याबबात बोलायला इतक्या गोष्टी आहेत की ती हैराण होईल पण, मी शांत राहिलोय.' असं लिहित बिलीनं शॅरनसोबतच्या एका इंटिमेट दृश्यादरम्यानचा फोटोसुद्धा त्याच्या या पोस्टसोबत जोडला. सध्या हॉलिवूडमध्ये 66 वर्षीय शॅरननं केलेले गंभीर आरोप अनेकांनाच हादरा देऊन जात आहेत. आता या प्रकरणाला आणखी कोणतं नवं वळण मिळणार हाच प्रश्नही काही मंडळी उपस्थित करताना दिसत आहेत.