अजय देवगन सोबत जोडलं करिश्माच नाव, करिश्माने दिले हे उत्तर....
ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याच्या अफवा देखील पसरायला लागल्या. मात्र, याबाबत करिश्माला विचारले असता, तिने दुसऱ्याच वेगळ्या गोष्टीवर आपला विचार मांडला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अजय देवगन या जोडीने बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. दोघांनीही बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. जिगर, सुहाग आणि शक्तीमान यासारखे त्यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. लोकांनीही त्यांना खूप पसंती दिली.
दोघांची जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली की, ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याच्या अफवा देखील पसरायला लागल्या. मात्र, याबाबत करिश्माला विचारले असता, तिने दुसऱ्याच वेगळ्या गोष्टीवर आपला विचार मांडला.
1993 साली घेतलेल्या एका मुलाखतीत करिश्मा म्हणाली, "आमच्यामध्ये लग्न करण्यासारख काहीच नाही. आमचा तसा प्लॅनही नाही." तिने दोघांच्या डेटिंगची बातमी नाकारली आणि सांगितले की, ते दोघे फक्त मित्र आहेत आणि ती अजून स्वत:ला लग्न करण्यासाठी खूप लहान समजत असल्याचे सांगितले.
करिश्मा म्हणाली की, "लोक माझ्या लग्नाबद्दल विचार कसा करू शकतात? हे मला समजत नाही. मी खूप विचित्र आणि विनोदी आहे." दोन्ही कलाकार अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. करिश्मा रुपेरी पडद्यापासून दूर राहून इतर गोष्टींमध्ये व्यस्त असते. तर अजयचे बरेच चित्रपट येत्या काळात रिलीज होणार आहेत.
अजय देवगणचे येत्या काळात मैदान, सूर्यवंशी, मेयडे आणि थँक्स गॉड या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. कोविडमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती आणि त्यानंतर अद्याप कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.