Oscars 2024: विजेत्यांनाच नाही तर नामांकिंतांनाही मिळतात 1 कोटीच्या भेटवस्तू, नेमकं काय असतं `या` हॅम्परमध्ये?
Oscars 2024 Goodie Bags : ऑस्कर फक्त विजेत्यांनाच नाही तर नामांकन मिळालेल्यांनाही देते गुडी बॅग... कोटीमध्ये आहे किंमत
Oscars 2024 Goodie Bags : आज 11 मार्च रोजी 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला ते सगळे घरी ती ट्रॉफी घेऊन जाताना आनंदानं गेले. पण जे विजेते आहेत त्यांना फक्त ट्रॉफी मिळते की त्यासोबत आणखी काही मिळतं असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर ऑस्कर विजेत्यांना फक्त सोन्याची दिसणारी ही ट्रॉफी मिळत नाही तर त्यासोबत त्यांना एक गुडी बॅग देखील मिळते. ऑस्कर दरवेळी नॉमिनेशन असलेल्या स्पर्धकांना खाली हात पाठवत नाही. पण या गुडी बॅगमध्ये कोणत्या गोष्टी असतात ते जाणून घेऊया. कारण त्यात काय काय असतं हे कळल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
जगातल्या सगळ्यात मोठ्या कार्यक्रम सोहळ्याचं हेच वेगळंपण आहे की कोणीही खाली जात नाही. प्रत्येक वर्षी ऑस्करच्या सगळ्या विजेत्या आणि नामांकन मिळालेल्यांना एक गुडी बॅग देण्यात येते. यावर्षी देण्यात येणाऱ्या गुडी बॅगची किंमत ही 1.4 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. चला तर जाणून घेऊया गुडी बॅगमध्ये काय खास आहे.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, यावर्षी बॅगमध्ये 50 पेक्षा जास्त वस्तू आहेत. नॉमिनीजला स्विट्जरलॅन्डच्या Ski Chalet चे लग्झरी वेकेशनचे पास असतात. ज्याची किंमत 41 लाख रुपये आहे. तर या ट्रिपवर नामांकन मिळालेले त्यांच्यासोबत 9 लोकांना घेऊन जाऊ शकतात. तिथे ते तीन रात्र राहू शकतात. इतकंच नाही तर दक्षिण कॅलिफोर्नियाच्या गोल्डन डोर स्पामध्ये सात दिवस राहण्याचा पास देखील यात आहे. ज्याची किंमत 19 लाख रुपये आहे.
हेही वाचा : Oscars 2024 Winners List: 'ओपनहायमर'नं 7 तर 'पुअर थिंग्स'नं 4, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी
त्याशिवाय त्याच्यात एक हॅन्डमेड हॅन्डबॅग देखील आहे. ज्या बॅगची किंमत 27000 आहे. तर नामांकनला 1 लाख रुपयाचं एक पोर्टेबल ग्रिल देखील देण्यात आला आहे. तर सायसोस्योरचं एक माइक्रो नीडलिंग ट्रीटमेंट देखील देण्यात येईल, ही ट्रीटमेंट त्वचेला टाइट करण्यात मदत करते. याची किंमत 8.2 लाख रुपये आहे. तर सगळ्यात स्वस्त गिफ्ट जे आहे रुबिक क्यूब आहे. ज्याची किंमत 1200 रुपये आहे. याशिवाय महागातल्या ब्रॅंडचे ब्यूटी प्रोडक्ट्स, स्कीन केयर प्रोडक्ट्स आणि लाइफस्टाइलसंबंधीत गोष्टी देखील या गुडी बॅगमध्ये आहे. या गुडी बॅगचा पूर्ण खर्च ऑस्कर्सचे ऑर्गनाइजर्स नाही, तर लॉस एन्जलिसची मार्केटिंग कंपनी डिस्टिंक्टव असेट करते. तर नामांकन मिळालेल्या सगळ्या कलाकारांना त्या गुडी बॅगला नकार देण्याचा हक्क देखील आहे.