बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाला जवळपास एक महिना झाला आहे. मात्र धर्माच्या भिंती ओलांडून झालेल्या या लग्नाची अद्यापही चर्चा रंगली आहे. जवळपास 7 वर्षं नात्यात राहिल्यानंतर 23 जूनला वांद्र्यातील अपार्टमेंटमध्ये एका खासगी सोहळ्यात दोघांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या शपथा घेतल्या. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झालेली भेट आणि त्या भेटीत लग्नासंबंधी झालेली चर्चा याबद्दल खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षी आणि झहीरने यावेळी त्यांनी त्यांच्या नात्याची बातमी सोनाक्षीचे वडील, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना कशी दिली याबद्दलही सांगितलं. तसंच कुटुंब लग्नाच्या विरोधात असल्याच्या अफवांवरही भाष्य केलं. मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने कबूल केलं की,  जेव्हा तिने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी झहीर इक्बालसोबतच्या लग्नासंबंधी चर्चा केली तेव्हा ती घाबरली होती.


अभिनेत्रीने एका मीडिया पोर्टलला सांगितलं की, "जेव्हा मी माझ्या वडिलांना आमच्याबद्दल सांगितले तेव्हा मीदेखील खूप घाबरले होते. ते काय प्रतिक्रिया देतील हे मला माहित नव्हतं. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यांना विचारलं की, 'तुम्हाला माझ्या लग्नाची अजिबात चिंता नाही का? कारणअ तुम्ही मला त्याबद्दल काहीच विचारलं नाही?' त्यावर ते म्हणाले मी तुझ्या आईला सांगितलं आहे की, 'आपल्या मुलीला विचार'. यानंतर मी त्यांना माझ्या आयुष्यात झहीर नावाचा एक मुलगा आहे असं सांगितलं. त्यावर ते म्हणाले 'हो, मी हे वाचलं होतं".


पुढे सोनाक्षीने सांगितलं की, "वडील म्हणाले तुम्ही आता मोठे झाले आहेत. मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी! मी विचार केला अरे हे तर फार सोपं होतं. माझे वडील फारच शांत आहेत हे माझ्या लक्षात आलं. त्यांनी आमच्या नात्याला पाठिंबा दिला".


यावेळी झहीर इक्बालनेही आपले सासऱे फारच प्रेमळ असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, "मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा फार घाबरलो होो. कारण त्या क्षणापर्यंत मी त्यांच्याशी समोरासमोर बोललो नव्हतो. ज्या क्षणी आम्ही बोलायला सुरुवात केली, आम्ही लाखो गोष्टींवर चर्चा केली आणि आम्ही मित्र झालो. अर्थातच, मी त्यांनी तुमच्या मुलीशी (सोनाक्षी सिन्हा) लग्न करण्यास इच्छुक असल्याचंही सांगितलं होतं. ते दिसताना असे फार गंभीर वाटतात. पण ते फार खरे आणि शांत आहेत. मला भेटलेली ती सर्वात गोड व्यक्ती आहे".