अवघ्या 15 वर्षांच्या असताना रेखासोबत बळजबरी! सर्वांसमोर किस केलं तरी लोकांनी वाजवल्या टाळ्या
अभिनेत्री रेखा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असा एक किस्सा घडला होता ज्यानंतर तिलाही या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला होता.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आत्तापर्यंत रेखा यांनी आपल्याला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला आवडतं. नुकतंच रेखा यांचं 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' ऑटोबायोग्राफी लॉन्च झालं. रेखा यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या पहिल्या किसचा उल्लेखही या ऑटोबायोग्राफीमध्ये करण्यात आला आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी किसींग सीन दिला होता. अभिनेता विश्वजीतसोबत रेखा यांचा पहिला किसींग सीन होता. विश्वजीतसोबत रेखा यांचा 5 मिनिटे जबरदस्ती किसींग सीन शूट करण्यात आल्याचं यामध्ये लिहीलं गेलंय. चला तर मग आज जाणून घेवूया हे संपुर्ण प्रकरण.
हे प्रकरण 1969 मध्ये आलेल्या 'अंजाना सफर' चित्रपटावेळचं आहे. दिग्दर्शक राजा नवाथे या सिनेमाचं दिग्दर्शक करत होते. या सिनेमाचं शूटींग मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू होतं. सिनेमाच्या शेड्युलमध्ये कुलजीत पाल, राजा आणि विश्वजीत यांनी रेखासाठी एक प्लान बनवला. त्या दिवशी रेखा आणि विश्वजीत यांच्यामधअये एक रोमँण्टिक सीन शूट होणार होता. जसं दिग्दर्शक राजा नवाथेने एक्शन म्हटलं त्यानंतर विश्वजीतने रेखाला त्याच्या मिठीत घेतलं आणि तिला जबरदस्ती किस करु लागला.
रेखाला खूप मोठा धक्का बसला. या किस संबधित याआधी रेखा यांना कसलीच कल्पना नव्हती अभिनेत्रीला याविषयी काहीच सांगण्यात आलं नव्हतं. कॅमेरा रोल होत होता. मात्र यादरम्यान ना दिग्दर्शक कट म्हणाला ना विश्वजीत थांबला. पुर्ण पाच मिनीटांपर्यंत तो रेखाला किस करत राहिला. या दरम्यान यूनिट मेंबर्स शिट्या वाजवून चिअर करत होते. रेखा यांचे डोळेदेखील बंद होते. मात्र तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू स्पष्ट दिसत होते.
विश्वजीतने आपल्या या किस सीनवर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती. हे सगळं त्याने दिग्दर्शक राजा नवाथेच्या सांगण्यानुसार केलं. यावेळी त्याने सांगितलं की, हे सगळं एन्जॉयमेंटसाठी नव्हतं. मात्र हे सिनेमासाठी महत्वाचं होतं. मात्र रेखा त्यावेळी खूप रागात होती. कारण तिला धोखा देण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सागतो की, या किसींग प्रकरणानंतर रेखाचं नाव विश्वजीतसोबत जोडलं जाऊ लागलं होतं,