मुंबई : तब्बू ही बॉलिवूडटी सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. तब्बू अशा कलाकारांपैकी एक आहे जिच्यासोबत कधीच कोणत्या कलाकाराने किंवा दिग्दर्शकाने काम करण्यासाठी नकार दिला नाही. मात्र एक असा कलाकार आहे ज्याने तब्बूसोबत कधीच काम केलं नाही. मात्र हा निर्णय दोन्ही बाजूने होता. मात्र याचं कारण हे एक पार्टी होती. जी पार्टी तब्बूचं करिअर सुरु होण्याआधीच झाली होती. ज्या पार्टीत तब्बू तिची बहिण  फराह नाजसोबत गेली होती. त्या पार्टीत  तिथे अभिनेता जॅकी श्रॉफदेखील उपस्थित होते. त्या पार्टीत असं काही झालं होतं ज्यामुळे तब्बूने सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर जॅकी श्रॉफसोबत काम करायला नकार दिला होता. या दोन्ही कलाकारांनी कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही.
 
ही पार्टी डैनीच्या घरी ठेवण्यात आली होती. 1986 साली तब्बूची बहिण फराह नाज आणि जॅकी श्रॉफ दिलजले या सिनेमात एकत्र काम करत होते. त्यामुळे या दरम्यान या सिनेमाची टीम कायम डॅनीच्या घरी पार्टी करायचे. अशाच एका पार्टीत फराह नाज तब्बूला घेवून गेली होती. या पार्टीला खास बनवण्यासाठी खाण्यापासून ड्रिंकपर्यंत सगळ्याची सोय करण्यात आली होती. सगळ्यांनी आप-आपल्या आवडत्या ड्रिंक घेतली आणि भरपूर खाल्लं सुद्धा. मात्र सुत्रांनुसार जॅकी श्रॉफयांनी थोडीशी ड्रिंक केली होती. यानंतर त्यांनी तब्बूसोबत असं कृत्य केलं की, फराह नाजला राग अनकंट्रोल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पार्टीत  जॅकी श्रॉफ यांनी नशेत तब्बूच्या जवळ गेले आणि तिच्यासोबत विचीत्र कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न करु लागले. डॅनीने जसं जॅकी श्रॉफ यांनी असं कृत्य करताना पाहिलं तेव्हा ती त्यांच्याकडे गेली आणि तिने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तिथून तब्बूपासून दुरही नेण्यात आलं. मात्र हा संपुर्ण प्रकार पाहून फराह नाज खूप नाराज झाली. त्यावेळी सगळीकडे या प्रकरणाची जोरदार चर्चाही  सुरु झाली. सगळ्या माध्यमात या प्रकरणाच्या बातम्या आल्या सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता. मात्र नंतर तिने हा गैरसमज असल्याचं सांगून सगळं प्रकरण शांत केलं. पण त्या पार्टीनंतर तब्बू आणि जॅकी श्रॉफने कधीच एकत्र काम केलं नाही.


तब्बू आजही अविवाहीत आहे. तब्बू जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती तेव्हा तिचं एका अभिनेत्यावर जिवापाड प्रेम होतं. ते प्रेम इतकं घट्ट होतं की, त्याची जागा आजपर्यंत दुसरं कुणीही घेऊ शकलं नाही. अनेक अडचणींमुळे तब्बू त्या अभिनेत्यासोबत लग्न करू शकली नाही. आणि त्याच्यानंतर दुस-या कुणाशी तिला लग्नही करावं वाटलं नाही.तब्बूच्या स्वप्नातील राजकुमार होता साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता नागार्जुन. एक वेळ अशी होती की, तब्बू आणि नागार्जुनच्या प्रेमाची मोठी चर्चा होत होती.