मुंबई : जेव्हा बॉलिवूडचे तीन खान टॉपचे हिरो होते, तेव्हा त्यांच्यात कोणते ना कोणते वाद व्हायचेच. आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यात सध्या चांगली मैत्री आहे, पण आमिरच्या एका वक्तव्यामुळे दोघांमध्ये बराच वाद निर्माण झाला होता. आज 14 मार्च रोजी आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. (Aamir Khan's Birthday) त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या एका विधानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॉगमध्ये लिहीलं होतं धक्कादायक विधान
ही गोष्ट आहे 2008 च्या सुमाराची. शाहरुख माझे पाय चाटत आहे, असे आमिर खानने त्याच्या एका ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. यानंतर त्याच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. आमिरने त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, मी दरीच्या बाजूला झाडाखाली बसलो आहे. मी समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचीवर आहे. अम्मी, इरा आणि जुनैद माझ्या शेजारी आहेत. शाहरुख माझे पाय चाटत आहे आणि मी त्याला बिस्किटे खाऊ घालतोय.


कुत्र्याचं नाव शाहरुख आहे
यानंतर आमिरने असंही स्पष्ट केलं होतं की, तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, शाहरुख हे आमच्या कुत्र्याचं नाव आहे. अधिक विचार करण्याआधी मला सांगावंसं वाटतं की, हे नाव मी ठेवलं नाही. हा आमच्या घरचा केअरटेकरचा कुत्रा आहे.


केअरटेकरने ठेवलं कुत्र्याचं नाव 
आमिरने सांगितलं की, शाहरुख काही वर्षांपूर्वी या घरात शूटिंग करण्यासाठी आला होता. त्याच दिवसात केअरटेकरने  कुत्रा घेतला आणि त्यामुळे तिने त्याचं नाव शाहरुख ठेवलं.


जेव्हा शाहरुख खानला आमिर खानच्या ब्लॉगबद्दल माहिती मिळाली. टाईम्स ऑफ इंडियाने आमिरच्या ब्लॉगवर दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानने याला उत्तर देत म्हटलं आहे की, "याने मला काही फरक पडत नाही, कारण मी सुद्धा अनेकदा अशा गोष्टी गंमतीने म्हणत असतो. मला वाटतं माझ्यामुळेही कुणाला तरी त्रास झाला असावा. आता शाहरुख खान आणि आमिर खान खूप चांगले मित्र आहेत.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने एका शोमध्ये शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली. तसंच आमिर खान म्हणाला होता की, गेल्या 20 वर्षांत त्याने शाहरुखसाठी एकही अपशब्द वापरलेला नाही.


नंतर माफी मागितली
पुढे ब्लॉगच्या शेवटी आमिरने लिहिलं होतं की, शाहरुखला पुन्हा एकदा माझ्याकडून अटेंन्शन हवं आहे.  त्याला दुर्गंधी येतेय, त्याला आंघोळीची गरज आहे. यानंतर आमिर खानने माफी मागितली आणि म्हणाला होता की, मला कोणालाही दुखवायचं नव्हतं.