काजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?
When Ajay Devgn Got Homesick During Honeymoon Kajol Revealed : हनीमूनला गेलेल्या अजय देवगणला खरंच आला होता का ताप? काजोलनं केला होता खुलासा...
When Ajay Devgn Got Homesick During Honeymoon Kajol Revealed : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगन हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. अजय आणि काजोल हे 1999 मध्ये लग्न बंधनात अडकले. तेव्हापासून जसे दिवस गेले आणि वर्ष गेले तसं त्यांचं नातं हे घट्ट होत गेलं. काजोल आणि अजय देवगण दोघं अनेकदा बिंद्धास्त अंदाजात दिसतात आणि ते दोघं एकमेकांविषयी मोकळेपणानं बोलताना दिसतात. दरम्यान, सध्या काजोलची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत काजोलनं तिच्या हनीमुनविषयी सांगत अजय देवगणविषयी एक मोठा खुलासा केला होता.
काजोलनं कर्ली टेल्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की अजय देवगननं त्यांच्या हनीमूनच्या 40 व्या दिवशीच दमला होता. तर त्यांनी तब्बल 2 महिन्याचं हनीमून प्लॅन केलं होतं. याविषयी सविस्तर सांगताना काजोल म्हणाली की 'मी अजयला विचारलं की तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे? मला सांग. जर तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल तर तू मला हनीमुनवर घेऊन जाशील.' त्यावर अजयनं उत्तर दिलं की 'ओके, बेबी.' पण हनीमूनवर शेवटी जेव्हा तो संपणार तेव्हा अजय दमला. त्याला घरची आठवण येत होती. 40 दिवसानंतर त्याचं असं झालं होतं की मी दमलोय, मला ताप आलाय. तर मी सांगितलं की ठीक आहे, आपण मग आता घरी जाऊया.'
काजोलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'महारागनी -क्वीन ऑफ क्वीन्स'मध्ये दिसणार आहे. चरण तेज उप्पलपतिचं दिग्दर्शनात असलेल्या या चित्रपटात तिच्यासोबत प्रभु देवा देखील दिसणार आहे. जवळपास 27 वर्षांनंतर जेव्हा काजोल आणि प्रभु देवा यांची जोडी एकत्र पाहायला मिळालेली आहे. या चित्रपटानंतर काजोल क्रिती सेननसोबत 'दो पत्ती' मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा : अयोध्यावासियांवर 'लक्ष्मण' भडकलेः राम मंदिर भूमीवरच भाजपच्या पराभवानंतर संतापला 'रामायण' फेम अभिनेता
दरम्यान, कामाविषयी बोलायचे झाले तर अजय देवगण सगळ्यात शेवटी शैतान या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात आर माधवनसोबत अजय देवगण पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसला. तर तो लवकरच 'सिंघम अगेन', 'रेड 2' आणि 'दे दे प्यार दे 2' मध्ये दिसणार आहे.