मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहे. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहचवायची असल्यास सोशल मीडिया हा उत्तम पर्याय मानला जातो. अपल्या आवडत्या सेलेब्रिटीबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता कायम चाहत्यांमध्ये असते. रणवीर-दीपिकाच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हे दोघे चक्क ८० वर्षाचे असलेले दिसत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर-दीपिकाच्या फॅनक्लब वर त्यांचा ८० वर्षातील वृद्ध अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो चाहत्यांनी 'एज ओल्ड' फिल्टरचा वापर करून साकारण्यात आला आहे. एडीट करण्यात आलेला हा फोटो त्यांच्या स्वागत सोहळ्या दरम्यानचा आहे. या फोटोमुळे रणवीर-दीपिका चांगलेच चर्चेत आले आहेत.


यंदाच्या वर्षी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'गली बॉय' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. रणवीरच्या भूमिकेला सुद्धा चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. सध्या तो '८३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. '८३' चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर त्यांच्या पत्नीची भूमिकेत दीपिका झळकणार आहे.


दीपिका पादुकोण 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून लग्नानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला हा चित्रपट आहे. १० जानेवरी २०२०ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.