मुंबई: आपल्या निष्पाप आणि तितक्याच खट्याळ अदांनी नव्वदीच्या दशकातील असंख्य तरूणांचा कलेजा खलास करणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. त्या काळात जुही चावलावर फिदा असलेल्या तरूणांची संख्या प्रचंड होती. पण, तुम्हाला माहिती आहे का आजही जुहिच्या चाहत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही तिचे चाहते तिच्यावर तितकेच फिदा असतात, जितके नव्वदीच्या दशकात होते. पण, या चहत्यांमध्ये एका अभिनेत्याचेही नाव आहे. ज्याचे जुहीवर जडले होते प्रचंड प्रेम.


बाल वयात इमरानच्या हृदयात जुहीचे घर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरान खान असे या अभिनेत्याचे नाव. एका मुलाखतीदरम्यान इमरानने दिलेल्या माहितीनुसार, इमरानला अमिर खानच्या कयामत से कयमात चित्रपटातील जुही प्रचंड आवडली होती. इतकी की तो तिच्यावर लट्टूच झाला होता. कदाचीत वाचून अनेकांना हसू येईल पण, इमरानला एका क्षणाला वाटले होते की, मामा अमिर खानच्या ऐवजी जुही सोबतच्या रोलमध्ये (कयामत से कयामत तक) मीच असायला हावा होतो. महत्त्वाचे असे की या चित्रपटात आमिर खानच्या बालपणाचा रोल इमराननेच केला आहे.  'त्या' बाल वयात इमरानच्या बाल हृदयात जुहीने घर केले.


'तिला प्रपोजही केले'


मुलाखती दरम्यान, इमरानने कहाणीतला ट्विट्सही सांगून टाकला. त्याने चक्क जुहीला प्रपोज केले होते. तो म्हणतो, जेव्हा मी मोठा झालो तेव्हा जुहीवर मला प्रचंड क्रश होता. कयामत से कयामत तक या चित्रपटात मला ती आवडली होती आणि तेव्हा मी तिला प्रपोजही केले होते. विशेष असे की, इमरान तेव्हा अवघ्या चार वर्षांचा होता म्हणे.



'जुहीही विरगळून गेली'


गंमत अशी की, कयामत से कयामतच्या शुटिंगदरम्या्न, त्याने जुहीला एक रिंगही दिले आणि तू मला प्रचंड आवडतेस. माझ्याशी लग्न करशील का असे थेट विचारूनही टाकले. त्याचे हे प्रेम पाहून जुहीही विरगळून गेली. त्याने त्याला एक छानशी झप्पी दिली आणि त्याची रिंगही घेतली.