मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. एकता कपूरची मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून मौनी रॉय लोकप्रिय झाली. त्यानंतर ती अनेक सिनेमांमध्ये देखील दिसली. यावर्षी मौनी रॉय अचानक चर्चेत आली त्याला कारण म्हणजे मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या आकाश अंबानीच्या लग्नात तिने केलेले कारनामे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलाचं आकाश अंबानीचं 9 मार्च रोजी लग्न झालं. आकाशने हीरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्र्लोका मेहतासोबत सात फेरे घेतले. आकाश अंबानीचं लग्नसोहळा चार दिवस चालला. या सोहळ्यात देश विदेशच्या सर्व मोठ्या सेलिब्रिटी उपस्थित होत्या. 


विदेशातून आलेल्या कलाकारांना Z+ सिक्युरिटी देण्यात आली होती. या लग्नाला बॉलिवूडचे कलाकार देखील सहभागी झाले होते. अंबानीच्या या पार्टीला टीव्हीमधून अभिनेत्री मौनी रॉय देखील पोहोचली होती. पार्टीमध्ये मौनी रॉय परफॉर्म करणार होती पण तिने अचानक हा परफॉर्मन्स रद्द करण्याची धमकी दिली. मौनीने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण पार्टीत फक्त तिचीच चर्चा होती. 


या सोहळ्याला अतिशय कडक सुरक्षा होती. त्यामुळे अंबानी कुटुंबियांना आपल्या सोहळ्यात कोणताच गोंधळ नको होतो. यामुळे सोहळ्यात येण्यापूर्वी प्रत्येक कलाकाराचा आणि पाहुण्यांचा देखील फोन सील करण्यात आला. सगळ्यांनी हा नियम पाळला पण मौनी रॉयने आपला फोन सील करण्यास मनाई केली. त्यानंतर खूप समजावल्यानंतर मौनीने आपला फोन सील करण्यास दिला पण या दरम्यान मौनी आणि सिक्युरिटीमध्ये खूप वाद झाले. याचमुळे तिने आपला परफॉर्मन्स रद्द करण्याची धमकी दिली.