मुंबई : नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक बरीच वर्षे एकत्र आहेत. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी 1982 साली लग्न केलं. दोघंही वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. तरीसुद्धा त्यांच्या प्रेमामध्ये धर्माची भिंत कधीच आड आली नाही. मात्र लग्नाआधी नसीरुद्दीन यांच्या आईनं विचारलं होतं की, लग्नानंतर रत्ना धर्म बदलणार आहेत का? यावर नसीरुद्दीन यांनी काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घ्या..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नसीरुद्दीन आणि रत्ना यांची भेट सत्यदेव दुबे यांच्या नाटका दरम्यान झाली होती. एका मुलाखतीत रत्ना यांनी त्यांच्या भेटी विषयी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, 'सत्यमेव दुबे यांनी आमची ओळख करून दिली. यावेळी आम्हाला एकमेकांन विषयी काहीच माहितं नव्हतं. मला त्यांचं नावसुद्धा माहित नव्हतं. पहिल्या दिवशी आम्ही भेटलो. दुसर्‍या दिवशी आमची मैत्री झाली आणि मग आम्ही एकत्र फिरू लागलो..


काय दिलं होतं आईला उत्तर
जेव्हा नसीरुद्दीन रत्ना पाठक शाह यांच्याशी लग्न करणार होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना विचारलं की, तू तुझ्या पत्नीचा धर्म बदलणार का? यावर नसीरुद्दीन यांनी त्यांना थेट नकार दिला. नसीरुद्दीन म्हणाले की, त्यांची आई शिक्षित नव्हती तरीसुद्धा त्याही नेहमीच धर्म बदलण्याच्या विरोधात आहेत..


ते म्हणाले, 'माझी आई एक पुराणमतवादी कुटुंबातील होती, तिचं शिक्षण झालं नाही, ती दिवसाला 5 वेळा नमाज करायची आणि ती आयुष्यभर उपवास करत राहिली. ती म्हणायची, आपल्या बालपणात ज्या गोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या त्या कशा बदलू शकतात? एखाद्याचा धर्म बदलणे योग्य नाही.'.


नसीरुद्दीन पुढे म्हणाले, 'आम्ही आमच्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल सांगितलं आहे, मात्र त्यांचा धर्म कोणता आहे हे आम्ही त्यांना कधीही सांगितलं नाही. मला वाटतं की धर्माबद्दलचा लवकरच सकारात्मक सुधारणा होईल. माझ्या मते मी लग्न केलेली हिंदू स्त्री ही सगळ्यांसाठी उत्तम उदाहरण आहे.'.


नसीरुद्दीन शाह 'रकसम' या शेवटच्या चित्रपटात दिसले. हा सिनेमा झी5वर रिलीज झाला होता. याशिवाय ते 'बंदिश बँडिट्स' या वेब शोमध्ये दिसले होते..