मुंबई : बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये जिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ती प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राने दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. या मुलाखतीत अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये होणारी तुलना बोलून दाखवली आहे. गेल्यावर्षी हॉलिवूड अभिनेत्रीने #MeToo हे कॅम्पेन सुरू केलं होतं. यामध्ये इंडस्ट्रीत होणार यौन शोषणवर आवाज उठवला आहे. ज्यामध्ये आता प्रियंका चोप्राने इंडस्ट्रीमध्ये रंगामुळे कशी वागणूक मिळते असं नाही. तसेच अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात सतत तुलना केली जाते. 


कशाचा होतो त्रास? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चोप्राने हल्लीच इंटरनॅशनल मॅगझीन इनस्टाइलला मुलाखत देताना म्हटलं आहे की, महिला आणि पुरूष यांच्या कामात सतत तुलना केली जाते. त्यावर ती पुढे म्हणाली की, माझा एक सिनेमा हातातून गेला कारण माझा रंग. तसेच माझ्या फिजिकॅलिटीमुळे काम हातून गेलं असल्याच म्हटलं आहे. फिजिकॅलिटीचा अर्थ मी शेपमध्ये यावं असं एजंटने मला सांगितलं. तसेच माझा रंग सावळा असल्यामुळे अनेकदा मला गोष्टी ऐकावं लागलं. 


अमेरिकेत काय कल्चर आहे? 


तसेच प्रियंकाने लैंगिक अत्याचारावर तसेच इंडस्ट्रीत होणाऱ्या असमानतेवर ती बोलली. अमेरिकेतही असं असतं मात्र याविषयावर आम्ही खूप खुलेपणाने बोलता येतात. मात्र भारतात अशा मुद्यावर खुलेपणाने बोलता येत नाही. तसेच आपल्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या अभिनेत्यासोबत अभिनेत्रीने काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, त्या सिनेमांत अभिनेत्रीला अधिक महत्व नसतं. ही भावना देखील प्रियंकाला खटकते.