जेव्हा राजेंद्र कुमार जिवंत असताना त्यांचा फोटो स्टुडिओमध्ये लागलेला पाहून राजकुमार यांनी शूज काढून टाकले होते....
राजकुमार यांची स्वत: ची एक वेगळी स्टाईल होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते राज कुमार बर्याचदा असं काहीतरी करायचे की, पहाणारे त्यांना बघतचं रहायचे. राजकुमार यांच्या समोर बोलण्याची हिंमत ना कधी कुणाची होती. ना कधी कुणाला आपला अपमान करून घ्यायची ईच्छा नव्हती. राजकुमार यांची स्वत: ची एक वेगळी स्टाईल होती. आणि बॉलिवूड इंडस्ट्रीनेही हे मान्य केलं होत. म्हणूनच त्यांच्या बोलण्याने कोणीच कधीच दुखवला जात नसे.
एकदा राजकुमार यांनी त्याच्या अॅटीट्युड आणि स्टाईलचा एक वेगळा नमूना सादर केला. राजेंद्रकुमार यांचा फोटो पाहताच राजकुमार यांनी शूज काढून टाकले. पण त्यांनी असं का केलं? जाणून घ्या.
पत्रकार अली पीटर जॉन हे राजकुमार यांचे खूप चांगले मित्र होते. एकदा त्यांनी राजकुमार यांच्याशी संबधित एक किस्सा सांगितला.
अली म्हणाले की, एकदा ते आणि राजकुमार त्यांच्या वरळीच्या घराकडून डिंपल स्टुडिओमध्ये जात होते.
अचानक वाटेत वांद्रे स्थानकाबाहेरच्या रेस्टॉरंटजवळ राजकुमार यांची कार बंद पडली. राज यांनी ताबडतोब कार तिथेच उभी केली. यांनंतर ते ऑटोमध्ये बसले आणि स्टुडिओमध्ये जायला निघाले. राज यांनी अली यांना सांगितले की, ते ऑटोमधील पहिल्या ट्रिपचा आनंद घेत आहेत आणि ते खूप एन्जॉयदेखील करत आहेत.
डिंपल स्टुडिओच्या प्रवेशद्वारा बाहेर राजकुमार यांच्या 'मदर इंडिया' चित्रपटामधील त्यांचे सहकलाकार राजेंद्र कुमार यांची फ्रेम असलेला फोटो त्यांना दिसला.
अली यांनी सांगितलं की, राजकुमार यांनी राजेंद्र कुमार यांचा फोटो पाहिल्यावर त्यांनी शूज काढून टाकले. त्यानंतर त्यांनी आपला सहकारी इब्राहिमला फोन केला आणि विचारलं की, "जानी, तू मला का नाही सांगितलं, राजेंद्र कुमार गेले?
अली यांनी सांगितलं की, राजकुमार यांची ही वेगळी स्टाईल होती एखाद्या माणसाला खाली पाडण्याची.
अली पुढे म्हणाले, भिंतीवरील हा फोटो राजकुमार यांना अशाप्रकारचा वाटत होता की, जसा माणसाच्या मृत्यूनंतर असा फोटो लावला जातो.