जेव्हा दीपिकाला रणबीर कपूरला कंडोम पॅकेट गिफ्ट करायचं होतं, पण...
एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
मुंबई : रणबीर कपूर दीपिका पदुकोण जरी आज चांगले मित्र-मैत्रिण असले तरी एकेकाळी, त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा झाली होती. रणबीर कपूरचं दीपिका पदुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनीही मीडियासमोर एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
वास्तविक, एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण एकवेळ अशी आली की रणबीर कपूरपासून विभक्त झाल्यानंतर दीपिका पदुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर रणबीर कपूर त्याची बहीण करीना कपूर खानसोबत करण जोहरच्या शोमध्ये गेला होता.
सोनम कपूर आणि दीपिका पदुकोण एकदा 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये एकत्र गेल्या होत्या. सोनमबद्दल असं म्हटले जात आहे की, 'सावरिया'च्या वेळी तिचं रणबीरसोबत अफेअर होतं. दीपिका पदुकोणसोबतच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत, कॉफी विथ करणच्या रॅपिड फायर दरम्यान, जेव्हा दीपिकाला विचारलं गेलं की, ती रणबीर कपूरला काय गिफ्ट देऊ इच्छिते तेव्हा तिने 'कंडोमचे पॅकेट' असं उत्तर दिलं.
जेव्हा दीपिका आणि सोनमला म्हटलं गेलं 'मीन गर्ल'
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याचा 'कॉफी विथ करण' शोमध्ये जेव्हा रणबीर कपूर या शोचा भाग बनला तेव्हा त्याने त्याची एक्स दीपिका पदुकोणबद्दल असं काही वक्तव्य केलं होते की, त्याची बहीण करीना कपूर देखील आश्चर्यचकित झाली होती.
वास्तविक दीपिकाच्या कंडोमच्या उत्तरावर रणबीरने दीपिकाला उत्तर दिलं होतं. रॅपिड फायर राउंड दरम्यान, करण जोहरने रणबीरला एक प्रश्न विचारला की, त्याच्यासाठी सर्वात वाईट मुलगी कोण आहे? यावर अभिनेत्याने पहिलं नाव दीपिका पदुकोणचे घेतलं. तर दुसऱ्या क्रमांकावर सोनम कपूर होती.