गर्लफ्रेंच्या C ग्रेड चित्रपटाने हादरला संजूबाबा; लाखो रुपये खर्चे करत केले हे काम
संजय दत्तचा आज 63 वा वाढदिवस आहे.
मुंबई : नुकताच 'शमशेरा'मध्ये (Shamshera) इन्स्पेक्टर शुद्ध सिंगच्या भूमिकेत दिसणारा संजय दत्त आज 29 जुलै रोजी 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्त हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पत्नी मान्यतासोबत संजय त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की एकदा संजय दत्तला मान्यताच्या एका सी-ग्रेड चित्रपटामुळे इतकी लाज वाटली की, त्याने लाखो रुपये खर्च करून फक्त त्याचे हक्क विकत घेतले नाहीत, तर त्याच्या सर्व सीडी आणि डीव्हीडी बाजारातून स्वत: कडे मागून घेतल्या.
संजयपेक्षा 19 वर्षांनी लहान मान्यता ही त्याच्या आयुष्यात तेव्हा आली जेव्हा त्याचा दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबत घटस्फोट झाला नव्हता आणि तो डान्सर नादिया दुर्रानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. लेखक यासर उस्मान यांनी त्यांच्या 'द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय संजय दत्त' या पुस्तकात अभिनेत्याच्या एका मित्राचा हवाला देत म्हटले आहे की, निर्माते नितीन मनमोहन यांनी मान्यताची ओळख संजय दत्तशी करून दिली, ज्याचे खरे नाव दिलनवाज शेख आहे.
दुबईमध्ये लहानाची मोठी झालेली मान्यता 1999 च्या सुमारास कुटुंबासह मुंबईत आली आणि चित्रपटसृष्टीत तिचं नशीब आजमावू लागली. यारी रोडवरील एका छोट्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मान्यताने 2002 मध्ये ‘लव्हर्स लाइक अस’ या सी-ग्रेड चित्रपटात काम केले. संजयला या चित्रपटाची लाज वाटली आणि त्याने 20 लाख रुपयांना चित्रपटाचे हक्क विकत घेतले. इतकंच नाही तर संजयने या चित्रपटाच्या सगळ्या सीडी आणि डीव्हीडी बाजारातून परत मिळवल्याची माहिती आहे.
प्रकाश झा यांच्या अजय देवगण स्टारर 'गंगाजल' मधील 'अल्हड मस्त जवानी' या गाण्याने मान्यताला पहिला मोठा ब्रेक मिळाला आणि या आयटम नंबरमुळे संजयलाही लाज वाटली असे म्हटले जाते. खुद्द प्रकाश झा यांनीही या गाण्यावर टीका केली होती.
संजयची गर्लफ्रेन्ड नादिया दुर्रानी जेव्हा शहराबाहेर असायची तेव्हा मान्यता त्याच्या घरी गुपचूप जाऊन राहायची. संजयच्या घरी ती जेवण देखील बनवायची. एकीकडे नादिया होती, जी संजयचे क्रेडिट कार्ड घेऊन खरेदी करायची आणि दुसरीकडे मान्यता, जिने त्याला क्रेडिट कार्डसारख्या गोष्टींबद्दल कधीच विचारले नाही. संजयच्या आवडीचे जेवण बनवून त्याच्या खाऊ घालायची.
2005 मध्ये मान्यता आणि संजय रिलेशनशिपमध्ये आले आणि 2006 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये एकत्र हजेरी लावत त्यांनी रिलेशनशिपवर शिक्का मारला. मान्यता आता संजय दत्तच्या आयुष्याची बॉस बनली होती. त्याच्या जेवणापासून ते घर, कपडे, आर्थिक आणि करिअर या सगळ्या गोष्टी ती सांभाळत होती. त्याच्यामुळेच संजय दत्तच्या आयुष्यात शिस्त आली. संजयच्या पार्ट्या आणि दारूवर नियंत्रण होते. संजय दत्तचे खरे मित्रच आता त्याच्या घरी येऊ शकतात.