मुंबईः छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर है' ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. 2015 पासून ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. या मालिकेतील 'अंगुरी भाभी' अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेबद्दल जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'सही पकडे हैं' म्हणत आपल्या खास शैलीने मनोरंजन करणारी 'अंगुरी भाभी' ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते. शुभांगी अत्रे ही मराठी अभिनेत्री ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी शिल्पा शिंदेने ही भूमिका साकारली होती.



शिल्पा शिंदेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं मात्र निर्मात्यांसोबत झालेल्या वादातून शिल्पा शिंदेने ही मालिका सोडली. आणि अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शुभांगी अत्रेची निवड झाली.



शुभांगी अत्रेला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. छोट्या-छोट्या नाटकांमधून तिनं अभिनय केला होता. तिला अभिनयातच करियर करायचं होतं. मात्र शुभांगीचं लग्न फारच लवकर झाल्याने तिला करियरसाठी अडचणी येत होत्या.



अनेक ठिकाणी ती ऑडिशनसाठी जायची मात्र 'विवाहित महिलांना इथं काम मिळत नाही' असे टोमणे तिला ऐकावे लागले.



सुरुवातीच्या काळात शुभांगी कुटुंबासह पुण्यात राहत असे, तिथून ती ऑडिशनसाठी मुंबईला यायची, मात्र विवाहित असल्याने काम मिळण्यात अडचण यायची, मात्र खचून न जाता तिनं तिचे प्रयत्न सुरू ठेवले, अखेर शुभांगीला अखेर काम मिळत गेलं आणि आज तिच्या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळत आहे.