मुंबई : बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचच्या घटना काही नवीन नाहीत. काम देण्याच्या नावावर किंवा सेटवर, अभिनेत्रींना खूप त्रास सहन करावा लागतो. कधी अभिनेते, कधी निर्माते, कधी दिग्दर्शक तर कधी कास्टिंग डायरेक्टर, प्रत्येकाला अभिनेत्रींचा फायदा घ्यायचा असतो. कामाच्या निमित्तानं अनेक अभिनेत्रींनी या अत्याचारांना सहन केले, परंतु काहींनी आवाज उठवून त्यांचे चेहरे उघडे पाडले. क्वचितच अशी कोणतीही अभिनेत्री असेल जिने आपल्या करिअरमध्ये याचा अनुभव घेतला नसेल.


आणखी वाचा : 'सजना है मुझे' म्हणत अंजली अरोरानं शेअर केला 'हा' बोल्ड व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या स्टाईल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. पहिल्यांदा एखाद्या निर्मात्याने तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले आणि दुसऱ्यांदा निर्मात्याच्या व्यवस्थापकाने केले,असा खुलासा स्वरानं केला. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत स्वरा भास्करने सांगितले की, एक फिल्ममेकर तिच्या मागे होत्र. तो तिला सतत फॉलो करत होता आणि कॉल करत होता.


आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या 'त्या' लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया



आणखी वाचा : ...म्हणून सलमान ऑनस्क्रीन कधीच Kiss करत नाही


स्वराने सांगितले की शूटिंगच्या निमित्तानं ती 56 दिवसांसाठी एका ठिकाणी गेली होती. शूटिंगच्या पहिल्या आठवड्यातच चित्रपट दिग्दर्शक तिच्याशी लव्ह, सेक्स आणि वन नाईट स्टँडवर बोलू लागला. त्यानं एकदा तिला सेटवर बोलण्याच्या नावानं हॉटेलच्या रूममध्ये बोलावलं आणि दारूच्या नशेत स्वराला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. हे खूप भीतीदायक होते, असे स्वरा म्हणाली. (when swara bhasker faced casting couch experience reveals a man kissed her during work meeting )


आणखी वाचा : स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, कॅमेरा समोर येताच...


'इंडियन एक्सप्रेस'च्या एका कार्यक्रमात स्वरा भास्करने दुसऱ्या घटनेचा उल्लेख केला. 'तिला एका निर्मात्याच्या मॅनेजरला भेटायचे होते. ती मॅनेजरला भेटली आणि बोलत असताना तो स्वरा जवळ आला आणि तिच्या कानाजवळ किस करण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि आय लव्ह यू बेबी म्हणू लागला. अचानक घडलेल्या या घटनेने स्वराला धक्का बसला आणि तिने मॅनेजरला हाकलून दिले. एवढंच नाही तर एका मुलाखतीत तिनं सांगितले की, 'तिच्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती की, जर चित्रपटात काम करायचे असेल तर आम्ही सांगू तसं करावं लागेल. तिला तसं करायचं नव्हतं यामुळे तिनं अनेक भूमिका गमावल्या.