'सजना है मुझे' म्हणत अंजली अरोरानं शेअर केला 'हा' बोल्ड व्हिडीओ

अंजलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 7, 2022, 06:29 PM IST
'सजना है मुझे' म्हणत अंजली अरोरानं शेअर केला 'हा' बोल्ड व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया स्टार आणि कंगना रानौतचा शो लॉकअपमुळे घरोघरी प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच ती दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे तिचं नुकतंच रिलीज झालेलं नवीन गाणं आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर लीक झालेला MMS व्हिडिओ. व्हिडीओ लीक झाल्यामुळे अंजली अरोरा खूपच नाराज आहे. तर गाणं हिट झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या 'त्या' लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

अंजली तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अंजली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अंजली अरोरा हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंजलीने नारंगी रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये अंजली तिच्या शरीराचे कर्व्स फ्लॉंट करत आहे. व्हिडिओमध्ये अंजली तिच्या नवीन 'सजना है मुझे' गाण्याचे प्रमोशन करत आहे. हे गाणे काल म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालं आहे.

आणखी वाचा : ...म्हणून सलमान ऑनस्क्रीन कधीच Kiss करत नाही

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, कॅमेरा समोर येताच...

अंजलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांना तिचा लूक आवडला तर काही लोकांनी अंजलीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल केलं आहे. व्हिडिओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला,  'दीदी थोडी लाज बाळगा'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'काही काळापूर्वी अंजली अरोरा एका एमएमएसमुळे चर्चेत आली होती.' मात्र, एका मुलाखतीत अंजलीनं स्पष्ट केलं होतं की, तिचा त्या एमएमएस व्हिडिओशी काहीही संबंध नाही आणि ती त्या व्हिडिओमध्ये नाही. मात्र यानंतरही तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात येत आहे.