`ती सध्या काय करते...` लग्नानंतर काय करतेय गजनी फेम Asin Thottumkal; जाणून घ्या
`गजनी` या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री असिन बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे.
मुंबई : गजनी फेम अभिनेत्री असिन ठोट्टुमकल ( Asin Thottumkal ) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ती घराघरात पोहचली. हिंदीसोबत असिनने आपल्या अभिनयाची छाप साऊथ सिनेमातही सोडली. तिने 2001 मध्ये Narendran Makan Jayakanthan Vaka या मल्याळम चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
'गजनी' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री असिन बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विशेष गाजलेल्या या अभिनेत्रीने राहुल शर्मा याच्याशी लग्न झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.
लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम
लग्नानंतर असिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितलं की, ती इंडस्ट्री कायमची सोडत आहे कारण तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. 2016 मध्ये असिनने बिझनेसमन राहुल शर्माला आपला लाईफ पार्टनर बनवलं. या जोडप्याने ख्रिश्चन आणि हिंदी रितीरिवाजानुसार लग्न केलं.
लग्नानंतर असिनने कामातून ब्रेक घेतला. यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. जिचं नाव अरिन आहे. असिन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती नेहमी आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जे तिच्या फॅन्सला खूप आवडतात. तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.
गजनी हा हिंदी चित्रपट असिनच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण या चित्रपटानंतर तिच्या आयुष्यात अनेक चित्रपटांची लाईन लागली. गजनी, रेडी, बोल बच्चन, ऑल इज वेल या चित्रपटांसह असिन (Asin) अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती.