एका गाण्यासाठी बिग बींना 3 महिने वेटिंगवर ठेवणारा दलेर मेहंदी सध्या आहे तरी कुठे?
Daler Mehndi Birthday Special : दलेर मेहंदी यांच्या विषयी अनेक गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नाही. त्यापैकी एक म्हणजे दलेर मेहंदी यांच्यासोबत काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी तब्बल तीन महिने प्रतिक्षा केली होती.
Daler Mehndi Birthday Special : 'तुनक तुनक तुन' या गाण्यासाठी लोकप्रिय पंजाबी गायक दलेर मेहंदी ओळखले जातात. लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दलेर मेहंदी यांचा आज 56 वा वाढदिवस आहे. दलेर मेहंदी यांची गाणी आणि त्याच्या करिअरविषयी आपल्याला अनेक गोष्टी माहित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या काही गोष्टींविषयी जाणून घेऊया. दलेर मेहंदी यांचा जन्म 18 अगस्त 1967 पटनामध्ये झाला होता. त्यांचे दोन भाऊ असून मीका सिंग आणि शमशेर सिंग अशी त्यांची नावं आहेत. 2019 मध्ये दलेर मेहंदी यांनी राजकारणात पदार्पण केलं. भाजपा पार्टीतून त्यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवासाला सुरुवात केली. पण त्याआधी त्यांचं आयुष्य कसं होतं याविषयी जाणून घेऊया...
दलेर मेहंदी यांच्यासोबत काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना करावी लागली होता तीन महिने प्रतिक्षा?
नेहमीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा मनात ठेवणाऱ्या दलेर मेहंदी यांना अचानाक एक दिवस अमिताभ यांचा फोन आला. त्याविषयी सांगताना दलेर मेहंदी म्हणाले की मी अमिताभ बोलतोय... मला आश्चर्य झाले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की पाजी कधीच कोणाला असंच फोन करून सांगू नका की मी अमिताभ बच्चन बोलतोय. मी दलेर मेहंदी आहे मला पण चक्कर आले. दुसरं कोणी असतं तर हार्ट अटॅक आला असता. मी त्यांचा खूप मोठा फॅन असल्यानं लहाण मुलांना जितकी उत्सुकता असते तितकी मला होती.
पुढे अमिताभ यांच्याविषयी बोलताना दलेर मेहंदी म्हणाले, अमिताभ पुढे फोनवर म्हणाले की मला तुझ्यासोबत काम करायचं आहे. मला खूप आनंद झाला. त्यानंतर माझं त्यांच्या मॅनेजरशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं की मी सरांना बोलू शकलो नाही पण तुम्हाला सांगतोय, माझे पुढचे तीन महिने पॅक आहेत. वर्षात 365 दिवस असतात पण मी 370 दिवस ता रा रा रा चे शो करतोय. त्यामुळे पुढचे तीन महिने मी येऊ शकणार नाही. तर बच्चन सरांकजून मला सांगण्यात आलं की तुम्ही तुमची डायरी पाठवून द्या, की तुम्ही पुढचे तीन महिने कुठे आहात. त्यानंतर मी त्यांना माझी डायरी पाठवली, पण मी खरंच खूप व्यस्त होतो. त्यामुळे तीन महिन्यांनंतर प्लॅनिंग झाली आणि आम्ही भेटलो.
हेही वाचा : Gadar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! ओलांडणार कमाईचा 300 कोटींचा गल्ला
पुढे दलेर मेहंदी या भेटीविषयी सांगत म्हणाले, बच्चन सर म्हणाले की त्यांना डर दी रब रब कर दी गाण्याचं म्युझिक प्रचंड आवडतं. ते म्युझिक त्यात असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मी ना ना ना रे ना हे गाणं बनवलं. मृत्युदाता या चित्रपटात हे गाणं होतं. या गाण्यात अमिताभ यांच्यासोबत दलेर मेहंदी देखील दिसले होते.
दलेर मेहंदी यांच्या विरोधात 2003 मध्ये अमेरिकेत एक तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचे कारण मानवी तस्करी होती. त्या प्रकरणात दलेर आणि त्यांचे भाऊ शमशेर यांच्यावर अवैधरित्या लोकांना अमेरिकेत पाठवण्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्या तब्बल 19 वर्षांनी 2018 मध्ये पटियाळा ट्रायल कोर्टानं त्यांना मानवी तस्करीशी संबंधिती दोषी ठरवलं. तर त्यानंतर दलेर मेहंदी यांनी केलेल्या याचिकेवर सुनावनी सुरु असताना जुलै 2022 त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना पटियाळाच्या केंद्रिय कारागृहात पाठवण्यात आले होते. तर त्यांना 2 हजार रुपयांचा दंड देखील देण्यात आला. पण त्यानंतर दलेर मेहंदी हे या प्रकरणी निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. तर त्या प्रकरणी त्यांचा भाऊ शमशेर सिंग होता, मात्र 2017 साली त्यांचे निधन झाले असून दलेर मेहंदी आता तुरुंगाच्या बाहेर आहेत.