तुम्हालाही आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? तर वापरा ही भन्नाट Trick
Aadhar Card Mobile Number Linked : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे तुम्हाला माहितीये? त्यामुळे सगळ्यांना आता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते शोधणं कठीण जाणार नाही.
Aadhar Card Mobile Number Linked : भारतात सगळीकडे आपल्याला आधार कार्डची गरज असते. आधार कार्ड भारतीयांची ओळख आहे. तर आधार कार्ड आज सगळीकडे व्हॅलिड आहे. म्हणजेच तुम्ही ओळख पत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड देऊ शकतात. अशात आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर देखील लिंक असतो. ज्यामुळे अनेकदा लोकं वेगवेगळे मोबाईल आणि त्यात एकपेक्षा जास्त नंबर वापरतात. त्यामुळे अनेकदा लोकं विसरून जातात की त्यांनी कोणता नंबर लिंक केला होता. अशात आज आपण अशा एका ट्रिकविषयी जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्हाला लगेच कोणता नंबर हा आधार कार्डला लिंक केला आहे ते कळतं.
यूआईडीएआई एक अधिकृत वेबसाईट आहे. त्या साईटवरून तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर कोणता नंबर लिंक करण्यात आला आहे याची माहिती मिळेल. सगळ्यात आधई टॉपला My Aadhaar वर क्लिक करा. इथे पुढे तुम्हाला Aadhaar Services हा पर्याय दिसेल. त्याच्या अगदीच खाली Verify Email/Mobile Number लिहिला असेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्डला तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते समोर येईल.
हेही वाचा : सोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार
दरम्यान, अनेकदा असं पाहायला मिळतं की जो नंबर तिथे टाकलेला असतो तो आधीच व्हेरिफाय झालेला असतो. त्यावेळी तुम्हाला एक मेसेज दिसेल तो मेसेज म्हणजे (The mobile number you have entered is already verified with our records) असं लिहिलेलं दिसतं. त्यानंतर जर तुम्ही जो मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नाही तो तिथे एंटर केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला आणखी एक मेसेज पाहायला मिळेल. त्यात लिहिलं असेल की (The mobile number you have entered does not match with our records) असा मेसेज लिहिलेला असेल. असं केल्यानं वेगवेगळ्या नंबरला एंटर केल्यानं तुम्हाला कळू शकतं की कोणता मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे आणि कोणता नाही. दरम्यान,सुरुवातीला तुम्हाला हे थोडं कठीण वाटेल पण तुम्ही सहजपणे करु शकता.