मुंबई : आज कुशल बद्रिकेला प्रत्येकजण एक उत्कृष्ट विनोदी कलाकार आणि अभिनेता म्हणून ओळखतो. चला हवा येऊ द्या या मंचावर तो आपल्या अभिनयाने सगळ्यांचे टेन्शन दूर करत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुशलच्या विनोदाचं टायमिंग खूप भारी आहे, अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. कुशल बद्रिके नाटक, शो यानंतर सिनेमांमध्ये सुद्धा आपली छाप पाडत आहे. 
नुकताच त्याचा पांडू हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याचनिमित्ताने कुशल बद्रिकेने आपल्या पत्नी आणि संपुर्ण कुटुंबासोबत  होम मिनिस्टरमध्ये हजेरी लावली होती. 


यावेळी कुशल आणि त्याच्या कुटुंबियांनी अनेक मजेदार भावनिक किस्से शेअर केले. बालपणीपासून ते आतापर्यंतचा कुशलचा प्रवास यानिमित्ताने सामान्य जनतेपर्यंत पोहोचला.


सगळ्यांचं टेन्शन दूर करणाऱ्या कुशलने त्याच्या खाजगी आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. ज्याचा उल्लेख त्याने आदेश बांदेकर यांच्यासमोर केला आहे.
 
आदेश बांदेकर यांनी कुशलला यावेळी अनेक प्रश्न विचारले.  त्यातीलच एक म्हणजे, पत्नीला लग्नासाठी कसं विचारलं आणि तिचं मनं कसं जिंकलं, त्यावर कुशलने कविता करत सुनैना हिला इंम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं. याबाबतचे किस्से शेअर करताना कुशलच्या पत्नीने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. 


कुशलला थांबवत त्याच्या पत्नीने हा किस्सा आदेश बांदेकर यांना सांगितला. सुनैना बद्रिके म्हणाली, " आम्ही एकाच नाटकात काम करत होतो. या नाटकात आम्ही पती-पत्नीचीच भूमिका साकारत होतो. यावेळी स्टेजच्या मागे अंधारात आम्ही उभे होतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे सुनैना म्हणाली, त्यानंतर लगेचच आम्हाला स्टेजवर एन्ट्री होती. तेव्हा विंगेत असताना कुशलने माझा हात धरला आणि धावत सुटला.. त्यात तो विंगेतून स्टेजवर जाताना मधे एक उभी लेव्हर होती, त्याला जोरात आदळला, त्यात त्याचे दात पडले. 4 ही दात गायब होते.. स्टेजवर लाईट होती, तेव्हा मी कुशलकडे पाहिलं तर मला प्रश्न पडला याचे दात कुठे गेले?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या आणि अशा अनेक आठवणी यावेळी कुशलची पत्नी सुनैना हिने शेअर केल्या आहेत.