मुंबई : अभिनेत्री पायल घोष दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. पायलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून न्याय मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली आहे. तिने त्या पोस्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, ती धोक्यात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री पायल घोषने ट्विटमध्ये लिहिलं आहे की,'अनुराग कश्यपने खूप वाईट पद्धतीने माझ्यावर फोर्स केला. नरेंद्र मोदी यावर कृपा करून ऍक्शन घ्या. आणि देशाला बघू दे या क्रिएटिव माणसामागे एक राक्षस लपला आहे. मला माहित आहे ही व्यक्ती मला त्रास देऊ शकते. माझी सुरक्षा धोक्यात आहे. प्लीज मला मदत करा.' या ट्विटनंतर सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. 


एवढ्या चर्चेत रंगलेली ही पायल घोष नेमकी आहे तरी कोण? 


पायल घोष एक अभिनेत्री आहे. जिने दक्षिण आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. पायल घोषने २०१७ मध्ये ऋषि कपूर यांच्या 'पटेल की पंजाबी शादी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. कोलकाताची राहणारी पायलने 'सेंट पॉल्स मिशन' शाळेल शिक्षण तर स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. सध्या ती मुंबईत राहत आहे. 


१७ व्या वर्षी पायल घोषने बीबीसीच्या टेलीफिल्म Sharpe's Peril मध्ये काम केलं आहे. ती या सिनेमांकरता एका मित्रासोबत गेली होती आणि सिलेक्ट झाली. 


इंग्रजी सोल्जर Richard Sharpe यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमात पायलने बंगालमधील एका स्वातंत्र्य सेनानीच्या मुलीची भूमिका साकारली होती. जी गावात राहणारी मुलगी आहे. 


तसेच पायलने एका कॅनेडियन सिनेमांतही काम केलं होतं. ज्यामध्ये तिने एका शाळेच्या मुलीची भूमिका साकारली होती. या मुलीने आपल्या शेजारच्या नोकराशी प्रेम केलं होतं. 


पायलच्या आई-वडिलांनी तिने सिनेमांत काम करावं असं वाटत नव्हतं. यामुळे कॉलेजच्या सुट्यांमध्ये ती कोलकातावरून मुंबईला धावत आली होती. त्यानंतर मुंबईत नावांकित किशोर ऍक्टिंग अकॅडमी जॉईन केली. तिथेच पायलची ओळख चंद्रा शेखर येलेती यांच्याशी झाली. ज्यांनी पायलला तेलुगू सिनेमा Prayanam काम केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत मंछु मनोजने काम केलं आहे.